नागपूर-पुणे प्रवास आता होणार आठ तासांत! नितीन गडकरींची घोषणा, नवा मार्ग ‘समृद्धी’ला जोडणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे ते नागपूर हा वेळखाऊ प्रवास आता अधिक जलद होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केलीये. पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला नवीन मार्ग जोडणार असल्याची गडकरी यांनी ट्विट करून सांगितलं.

पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी नवा मार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाला जोडण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली. एक्स्प्रेस वे जोडणीमुळे पुण्यावरून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला आठ तासांत पोहोचणं शक्य होईल, असं नितीन गडकरींनी म्हटलंय.

Pune-Nagpur प्रवास आठ तासांत कसा होणार?

मुंबई-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला असून, आता पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘त्या’ ऑफरवर नितीन गडकरी म्हणाले, ‘विहिरीत उडी मारून जीव देईन, पण काँग्रेसमध्ये येणार नाही’

नागपूर-पुणे अंतर कमी करण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस वे तयार करून तो औरंगाबादजवळ समृद्धी मार्गाला जोडला जाणार आहे.

ADVERTISEMENT

या महामार्गामुळे पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास अडीच तासांत आणि पुढे समृद्धी महामार्गावरून नागपूर-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास साडेपाच तासांत करणं शक्य होणार आहे. त्यामुळे नागपूर ते पुणे प्रवासासाठी हा मार्ग झाल्यानंतर आठ तासात वेळ लागेल, असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

वाघासारखा माणूस! बाळासाहेबांना आठवताना…: नितीन गडकरी

Aurangabad-Pune expressway : नवा महामार्ग जाणार चार जिल्ह्यांतून

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहनांची रहदारी वाढली असून, त्यामुळे औरंगाबाद-पुणे या शहरांना जोडणारा स्वतंत्र एक्स्प्रेस वे उभारण्यात येणार आहे. Aurangabad-Pune expressway हा २६८ किमी लांबीचा असणार आहे. पुणे, अहमदनगर, बीड आणि औरंगाबाद अशा चार जिल्ह्यांतून हा जलदगती महामार्ग जाणार आहे.

Aurangabad-Pune expressway हा महामार्ग पुण्यातील पुणे बंगळुरू महामार्ग म्हणजे प्रस्तावित रिंग रोड येथून सुरू होईल. तर औरंगाबाद येथे समृद्धी महामार्गाजवळ याचा शेवट असणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT