New Hit And Run Law : काय आहे नवा हिट अँड रन कायदा? ज्याला ट्रक ड्रायव्हर्सचा जोरदार विरोध
केंद्र सरकारने नुकताच नवा मोटार वाहन कायदा हा पारित केला आहे. ज्यामध्ये हिट अँड रनला (Hit And Run Law) आळा बसावा यासाठी अत्यंत कठोर अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT

New Hit And Run Law : देशभरातील बस आणि ट्रक ड्रायव्हर्सनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या ड्रायव्हर्सच्या युनियन्सनी देखील चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे. ट्रक ड्रायव्हर्सच्या या आंदोलनाचे विविध राज्यात पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील नवी मुंबईत तर चक्क आंदोलक ड्रायव्हर्सनी पोलिसांनाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ट्रक आणि बस ड्रायव्हर्सच्या या आंदोलनाने संपूर्ण देश पेटलाय. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन हिट अँड रन कायद्यामुळे हे आंदोलन होत आहे. त्यामुळे ट्रक आणि बस ड्रायव्हर्सना आंदोलन करायला भाग पाडणारा तो नवीन हिट अँड रन कायदा काय आहे? हे जाणून घेऊयात. (new hit and run law indian truck driver declared strike)
देशभरातील ट्रक ड्रायव्हर्सनी नवीन हिट अँड रन कायद्या विरोधात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह यासह अनेक राज्यात आंदोलन पुकारले आहे. गाझियाबादमध्ये तर ट्रक ड्रायव्हर्सच्या संपानंतर सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरीकांना त्यांच्या कामावर आणि घरी जाण्यास अडचण येत आहेत. एकूणच गाझियाबादमधली सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
नवी मुंबईत पोलिसांवर हल्ला
महाराष्ट्रातील नवी मुंबईत उलवे येथे बेलापूर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला होता. यावेळी रस्त्यावर उतरलेले ट्रक चालक हे फारच आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. या ट्रक चालकांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवत त्यांना बेदम मारहाण केली होती. तर उलवे नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा ट्रक चालकांनी प्रयत्न केला. ज्यानंतर एनआरआय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतले. तर काही ट्रक चालकांनी पनवेल-सायन महामार्ग रोखला असल्याने प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
हे ही वाचा : Lok Sahba 2024 Seat : ‘मनाने अजित पवारांसोबत’, शिरसाटांच्या दाव्यावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
नवीन कायदा काय?
यामध्ये आता अपघात झाल्यानंतर पळून जाणे हे हिट अँड रन समजले जाते. तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात येत होती आणि जामीनही मिळत होता. बदलत्या नव्या नियमानुसार जर कोणी वाहनाला धडक दिली आणि चालक पोलीस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि दंडही ठोठवला जाणार आहे. या कायद्याला चुकीचे ठरवत देशभरातून आंदोलन केले जात आहे.