पुणे रेल्वे स्थानकात दुर्दैवी घटना! घरी जाण्यासाठी निघाला अन् गाडीत चढतानाच गेला जीव

Pune Railway Station incident : बिहारमध्ये जाणाऱ्या एक्स्प्रेस गाडीत चढण्यासाठी अचानक प्रवाशांची झुंबड उडाली, यात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
passenger died at pune railway station
passenger died at pune railway station

दिवाळीसाठी घरी निघालेल्या एका प्रवाशाचा पुणे रेल्वे स्थानकावर मृत्यू झाला. रेल्वे गाडीत चढण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली. प्रचंड गर्दीमुळे प्रवाशाचा श्वास गुदमरला आणि त्याचा रेल्वे स्थानकातच मृत्यू झाला.

दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी प्रवाशांची रीघ लागली असून, मिळेल त्या वाहनानं लोक घरी पोहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बस स्थानकं, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. अशाच गर्दीमुळे पुण्यात दुर्दैवी घटना घडलीये.

पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा मृत्यू का झाला?

पुणे रेल्वे स्थानकावर मृत्यू झालेल्या प्रवाशाबद्दल पोलिसांनी माहिती दिलीये. साजन बलदेवन यादव (वय 30 वर्ष) व त्याचा पुतण्या बौधा मांझी हे (रा. मूळगाव - राम जालान मांझी वार्ड नं 5 , कंटी नवादा बीथो गया बिहार) हे गेले १५ दिवसापूर्वी बिगारी कामाकरीता पुण्यात आले होते.

ते दोघे शनिवारी (२२ ऑक्टोबर) दानापूर एक्स्प्रेसने परत गावी निघाले होते. मयत व्यक्ती हा आजारी होता. साजन बलदेवन यादव यांना पूर्वीपासून दम्याचा त्रास होता. त्यामुळे गाडी चढत असताना त्यास अचानक जोरात खोकला आला. श्वास कोंडला गेल्यानं त्याचा जीव घाबरा झाला.

त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला खाली उतरवून मोकळ्या हवेसाठी प्लॅटफॉर्मबाहेर घेवून गेले. त्यानंतर तो इसम खाली पडून बेशुद्ध झाला. नंतर रेल्वे स्टेशनवरील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्यास मयत घोषित केलं.

मयत व्यक्तीला कोणतीही मारहाण अथवा धक्कबुक्कीची झाल्याच्या खुणा नाहीत. त्याच्यासोबत त्याचे नातलगही आहेत, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कोणतीही चेंगराचेंगरी न झाल्याची माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in