नवा वाद! “अजित पवारांच्या भाषणाला पंतप्रधान कार्यालयानेच परवानगी दिली नाही”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही. यावरून राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान कार्यालयानेच अजित पवारांच्या भाषणाला परवानगी दिली नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

“अजित पवार हे पालकमंत्री आहेत आणि पंतप्रधानांचाच प्रोटोकॉल त्यांना लागू असतो. त्यामुळे त्यांना हजर राहणे आवश्यक असतं. केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात पंतप्रधान येणार असतील, तर पालकमंत्र्यांना जावं लागतं. अजित पवार तिथं जाणं योग्यचं आहे. पण, तिथं बोलायला दिलं नसेल, तर मला ते अयोग्य वाटतं. प्रोटोकॉलप्रमाणे ते पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवारांचं भाषण असायला हवं होतं,” असं ते म्हणाले.

“अजित पवारांच्या कार्यालयाने (उपमुख्यमंत्री कार्यालयाने) पंतप्रधान कार्यालयाकडे विनंती भाषण करू देण्याची विनंती केली होती. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांचा अधिकार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अजित पवारांच्या कार्यालयाला परवानगी दिली गेली नाही. हे अतिशय गंभीर आहे. मला स्वतःला वेदना देणारं आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“अजित पवार यांना पंतप्रधानांच्या सभेत बोलू न देणं हे जाणिवपूर्वक घडलं आहे असं दिसतं. गतवेळेस दादांनी (अजित पवार) पंतप्रधानांसमोर राज्यातील महत्वाच्या व्यक्तीची शिवराय व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणली होती. त्याचाच राग निघालेला दिसत आहे,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.

“मोदी म्हणाले अजितदादांना बोलू द्या, पण…” वाचा देहूतल्या कार्यक्रमात स्टेजवर नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी मोदी सरकार आणि भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. “त्यांना भाषण करु दिलं नाही की, भाषण केलं नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा म्हणजे फडणवीस हे स्वत:ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच समजतात. मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. ते आपण गेली अडीच वर्ष आपण पाहतोय. परंतु देशाच्या पंतप्रधानांना याचं भान असणं आवश्यक होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही, तर उपमुख्यमंत्री उपस्थित असतील तर त्यांना भाषण करु देणं आवश्यक होतं. मात्र, त्यांनी ते करु दिलेलं नाही,” असं चव्हाण म्हणाल्या.

ADVERTISEMENT

देहूतील कार्यक्रमाचे आयोजक आणि भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.

“प्रोटोकॉल तुटला असं म्हणता येणार नाही. देहू देवस्थानने पंतप्रधान मोदींना आमंत्रित केलं होतं. अजितदादा पवार हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पंतप्रधानांच्या व्यस्त कार्यक्रमाची रुपरेषा आणि त्यातून कोणी किती बोलावं हे पंतप्रधान कार्यालय ठरवतं. आपण जर हा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला असेल, तर स्वत: पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारणा केली होती की, आपण बोलू इच्छित आहात का? पण त्यावेळी अजितदादांनी नकार कळवला आणि नंतर पंतप्रधान भाषणाला उभे राहिले,” असं तुषार भोसले म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT