Mla Disqualification : “नार्वेकरांचा निर्णय हाच भूकंप असेल”, चव्हाणांचं मोठं विधान
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “राज्यात पक्षांतर बंदी कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन झाल आहे. गद्दारी करून सत्तांतर करण्यात आलं. जनतेने दिलेल्या मताची प्रतारणा करून स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेच्या मतांची विक्री केली गेली.”
ADVERTISEMENT

-स्वाती चिखलीकर, सांगली
Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १० जानेवारी रोजी निकाल देणार आहेत. हा निकाल कुणासाठी धक्का असणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे. महत्त्वाचं म्हणजे नार्वेकरांच्या निर्णयामुळे राजकारणात मोठा हादरा बसू शकतो, असेही म्हटले जात आहे. पण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नार्वेकरांच्या निर्णयाबद्दल सूचक विधान केलं आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, इंडिया आघाडी जागावाटप आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केलं.
नार्वेकरांचा निर्णयच धक्का असेल -चव्हाण