पुणे: समोरून आले आणि तरुणाच्या पायावर मारली गोळी, कारण त्यांना हवं होतं 'हे'
Pune Crime News : पुण्याच्या पिंपरी कॅम्पमध्ये एका अज्ञात चोरट्याने एका तरुणाच्या गळ्यातून सोन्याची चैन खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणाने त्याला विरोध केल्याने चोरट्याने त्याच्या पायावर गोळी झाडली.

बातम्या हायलाइट

पुण्यात सोन्याची चैन चोरणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट

चोरट्याने तरुणाच्या पायावर मारली गोळी

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?
Pune Crime News : पुण्याच्या पिंपरी कॅम्पमध्ये एका अज्ञात चोरट्याने एका तरुणाच्या गळ्यातून सोन्याची चैन खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणाने त्याला विरोध केल्याने चोरट्याने त्याच्या पायावर गोळी झाडली. ही धक्कादायक घटना पिम्परी कॅम्पमध्ये दुपारी जवळपास 1.30 वाजता घडली. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भावेश काकरानी असं जखमी तरुणाचं नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, भावेश एका किराणाच्या दुकानाबाहेर बसला होता. तेव्हा एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणाने त्याला प्रतिकार केला असता आरोपीने त्याच्या पायावर गोळी मारली. त्यानंतर भावेश गंभीर जखमी झाला आणि त्याच्या जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं.
हे ही वाचा >> "सध्या, मुली नग्न होऊन पैसे कमवतात" साध्वी ऋतंभरांनी केलं 'ते' विधान अन् पुन्हा वाद...
सीसीटीव्ही बंद होते..पोलिसांनी तपासासाठी काय केलं?
या घटनेनंतर अज्ञात चोरटा फरार झाला आहे. या घटनेमुळं पिम्परी परिसरात मोठी खळबळ माजली आहे. पिंपरी पोलीस, क्राईम ब्रॅन्च आणि फॉरेन्सिक युनिट तातडीनं घटनास्थळी पोहोचले. ज्या ठिकाणी गोळीबारी झाली, तेथील सीसीटीव्ही बंद झाल्याने पोलिसांना तपासादरम्यान अडचणी निर्माण झाल्या. पोलीस अन्य सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, पिम्परी कॅम्पमध्ये दुपारी दीड वाजता एका तरुणाच्या पायावर गोळी मारण्यात आली. जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.