मीरा रोड: लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्ब्यात चढला पोलीस, अश्लील इशारे आणि घाणेरड्या गोष्टी, महिला वैतागल्या आणि...

मुंबई तक

mumbai crime : मुंबईलगतच्या मीरा भाईंदरमध्ये एका लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. मीरा रोड स्थानकावरून लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एक मद्यधुंद पोलीस अधिकारी शिरला. त्यानंतर महिलांसोबत त्याने अश्लील वर्तन केलं.

ADVERTISEMENT

mumbai crime
mumbai crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई लोकल रेल्वेतील महिलांच्या डब्यात मद्यधुंद पोलीस

point

अश्लील हावभाव करण्यास केली सुरूवात

point

नेमकं काय झालं?

Mumbai Crime : मुंबईलगतच्या मीरा भाईंदरमध्ये एका लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. मीरा रोड स्थानकावरून लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एक मद्यधुंद पोलीस अधिकारी शिरला. त्यानंतर महिलांसमोर त्याने अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. त्याने काही महिलांना स्पर्श देखील केला. कॉन्स्टेबलने केलेल्या कृत्याने महिला डब्यात असलेल्या महिलांना धक्का बसला आहे. दरम्यान, आरोपी पोलीस कॉन्सेबलचे नाव किशोर सपकाळ आहे. त्याच्याविरोधात वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 

हे ही वाचा : धावत्या लोकलमधून चोरट्याने मोबाईल हिसकावला, प्रवाशाचा गेला तोल अन् पाय चिरडले, नेमकं ठाण्यात काय घडलं?

कॉन्स्टेबलचे महिलांच्या रेल्वे डब्यात अश्लील कृत्य 

कॉन्स्टेबलने महिलांचे तिकीट तपासण्याचे नाटक केले. तसेच वाईट नजरेनं महिलांकडे पाहण्याचा प्रयत्न केला. कॉन्स्टेबलने केलेल्या या कृत्याची रेल्वे विभागाला माहिती दिली. त्यानंतर कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बोरिवलीहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ही लज्जास्पद घटना उघडकीस आली. काही महिलांनी आरोप केला की, कॉन्स्टेबलने घाणेरडे कृत्य केलं आणि महिलांना स्पर्श केला.

महिलांनी पोलीस कॉन्स्टेबलला मध्येच उतरवलं नंतर...

त्यानंतर त्यांनी आरोप केला की, त्याने मोबाईल फोनही हिसकावून घेतले. हा सर्व प्रकार घडत असताना, नायगाव स्थानकावर त्याला महिलांनी उतरण्यास सांगितले. त्यानंतर पीडित महिलांनी कॉन्स्टेबलच्या स्टेशन मास्टर्सना कळवले. त्यानंतर स्टेशन मास्टर्सने वसई रोड पोलिसांना बोलावले. त्यानंतर वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा : पत्नीचं बाहेर होतं लफडं, पतीला कळताच दोघांमध्ये झाला वाद, महिलेनं निर्जनस्थळी नेलं अन् ...

संबंधित प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितलं की, पुढील प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कॉन्स्टेबलचे नाव किशोर सपकाळ असल्याची माहिती समोर आली. तो वसई, विरार, मीरा-भाईंदरचे कमिश्नरेट म्हणून कार्यरत आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp