पुण्यात दुर्दैवी अपघात: बास्केटबॉलचा हुप विद्यार्थ्याच्या डोक्यात कोसळल्याने तरुणाचा करुण अंत, कॅम्पसमध्ये संतापाची लाट

मुंबई तक

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बास्केटबॉलच्या 'हूप'पुश-अप्स करताना हुप कोसळला, या दुर्घटनेत बी.टेकचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव विपुल शर्मा असे आहे, तो मूळचा उत्तर प्रदेशातील आयोध्या येथील रहिवासी आहे.

ADVERTISEMENT

Pune crime
Pune crime
google news

बातम्या हायलाइट

point

बास्केटबॉलच्या 'हूप'वर पुश-अप्स काढताना तरुणाचा करुण अंत

point

उपचारानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं

Pune Crime : -  श्रीकृष्ण पांचाळ - पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बास्केटबॉलच्या 'हूप'ला पकडून पुश-अप्स करताना हुप कोसळला, या दुर्घटनेत बी.टेकचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव विपुल शर्मा असे होते, तो मूळचा उत्तर प्रदेशातील आयोध्या येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच, आई-वडील तातडीने पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान, हा धक्कादायक प्रकार पुण्यानजीक ताळेगाव इंदुरी परिसरात घडला आहे. 

हे ही वाचा : पुणे : घट्ट पकड, नाहीतर राजाला दुसरी बायको आणावी लागेल; निवृत्त सैनिकाच्या नातेवाईकांचा हवेत गोळीबार VIDEO

संबंधित घटनेनंतर. 'तोलानी इन्स्टिट्यूट'मधील विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे. या प्रकरणातील निष्काळजीपणासाठी जबाबदारी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार, असे आश्वासन पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिले. संबंधित प्रकरण हे तळेगाव इंदुरी भागातील आहे. 

बास्केटबॉलच्या 'हूप'वर पुश-अप्स काढताना तरुणाचा करुण अंत

घडलेल्या घटनेनुसार, विपुल हा बास्केटबॉल कोर्टच्या बाजूने जात असताना, त्याने बास्केटबॉलच्या 'हूप'वर पुश-अप्स काढले. याच दरम्यान, जड लोखंडी हूप अचानकपणे तुटला आणि थेट त्याच्या डोक्यावर आदळला, ज्यात तरुणाला गंभीर दुखापत झाली. यानंतर अतिरक्तस्त्रावामुळे तो बेशुद्धवस्थेत पडला. 

उपचारानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं

तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी काही काळाचा विलंब झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. नंतर त्याला तळेगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनं विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

हे वाचलं का?