पुणे: क्लास वन अधिकारी महिलेच्या पतीनेच शूट केले बाथरूममधील 'ते' VIDEO, पत्नीलाच करायचा ब्लॅकमेल!
पुण्यातून एका क्लान वन सरकारी अधिकाऱ्याने आपल्या पत्तीचे अंघोळ करताना व्हिडीओ काढले आणि ते दाखवून पत्नीला ब्लॅकमेल केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नीच्या खाजगी क्षणांचे व्हिडीओ काढले

व्हिडीओ दाखवून व्हायरल करण्याची धमकी

पुण्यातील क्लास वन अधिकाऱ्याचे संतापजनक कृत्य
Pune Crime: पुण्यातून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका क्लान वन सरकारी अधिकाऱ्याने आपल्या पत्तीचे अंघोळ करताना व्हिडीओ काढले आणि ते दाखवून पत्नीला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणासंदर्भात पत्नीने आपला पती आणि त्याच्या घरच्यांविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, आरोपीने आपल्या घरातील बऱ्याच ठिकाणी तसेच बाथरुममध्ये देखील गुप्त कॅमेरे लावले होते. अशाप्रकारे पत्नीचे खाजगी क्षण कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून नंतर पतीने ते व्हिडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल आणि धमकवण्यास सुरूवात केली.
प्रकरणातील पीडित महिला स्वत: क्लास वन अधिकारी असून तिने आपला पती आणि त्याच्या कुटुंबातील 7 सदस्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पती सतत आपला शारीरिक आणि मानसिक छळ करत असून सासरच्या लोकांनी देखील माहेराहून पैसे आणि कार आणण्यासाठी दबाव आणल्याचं पीडितेने तक्रारीत सांगितलं.
लग्नानंतर चारित्र्यावर संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये संबंधित जोडप्याचं लग्न झालं होतं. सुरुवातीच्या वर्षांमध्ये सगळं काही ठीक होतं मात्र काही काळानंतर पतीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. त्यानंतर पतीने आपल्या पत्नीच्या प्रत्येक हालाचालीवर लक्ष ठेवण्याचा ठरवलं. यासाठी आरोपीने त्याच्या घरात स्पाय कॅमेरे लावले होते.
हे ही वाचा: 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे शारीरिक संबंध, “सगळं संमतीने होतं…” मुंबई कोर्टाचा मोठा निर्णय!
EMI च्या पैशांसाठी केलं ब्लॅकमेल
आरोपीने तिच्या पत्नीला माहेराहून 1.5 लाख रुपये आणले नसल्यास तिचे अंघोळ करताना काढलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची देखील धमकी दिली असल्याचा पीडितेने आरोप केला. कार आणि होम लोनच्या EMI चे पैसे भरण्यासाठी त्याने पीडितेकडे पैशांची मागणी केली होती.
सासरच्या लोकांवर अत्याचार केल्याचा आरोप
महिलेने आपल्या सासरच्या मंडळींवर सुद्धा गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर तिच्या सासरचे लोक नेहमी पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. तसेच माहेराहून पैसे आणि इतर सामान आणण्यासाठी सुद्धा दबाव टाकत असल्याचं पीडितेने सांगितलं.
हे ही वाचा: मुंबई हादरली! बापासह दोन भावांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले, तब्बल...महिने भयंकर कृत्य
पोलिसांचा तपास
आंबेगाव पोलिसांनी पीडितेचा पती आणि तिच्या सासरच्या 7 सदस्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ब्लॅकमेलिंग, घरगुती हिंसाचार, शोषण आणि गोपनीयतेचे उल्लंघन यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले घरातील स्पाय कॅमेरे आणि व्हिडीओ फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच अधिक पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात पोलिसांचा तपास सुरू आहे.