2000 note, SBI : ना ओळखपत्र, ना फॉर्मची गरज; 2000 च्या नोटा कशा बदलायच्या?

मुंबई तक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 ची नोट व्यवहारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. 23 मे 2023 पासून नोटा बदलता येणार असून, नोटा कशा बदलायच्या याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या.

ADVERTISEMENT

SBI : No hassle of filling form, no need to show identity card... Rs 2000 notes will be changed like this from tomorrow
SBI : No hassle of filling form, no need to show identity card... Rs 2000 notes will be changed like this from tomorrow
social share
google news

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयाच्या नोटा व्यवहारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. आता नोटा बदलण्याची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 23 मे 2023 पासून सुरू होत आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही या 2000 नोटा सहजपणे बदलू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म (रिक्विजिशन स्लिप) भरण्याची गरज नाही किंवा तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र मागितले जाणार नाही. तुम्ही एकावेळी 2000 रुपयाच्या 10 नोटा बदलू शकता. (how to change Rs 2000 notes in the bank)

SBI कडून काय देण्यात आली माहिती?

2000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये ओळखपत्र दाखवावे लागले, असे दावे सोशल मीडियावर केले जात होते. या अहवालांवर, देशातील सर्वात मोठी बँक SBI ने त्यांच्या सर्व शाखांना कळवले आहे की, RBI ने गेल्या शुक्रवारी तात्काळ प्रभावाने चलनातून काढलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणताही फॉर्म आणि कोणतंही ओळखपत्र पुराव्याची आवश्यकता नाही. बँकेने 20 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात प्रत्येकाला 2,000 रुपयांच्या इतर मूल्यांच्या नोटा बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे.

30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार

चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या या 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. RBI नुसार, कोणतीही व्यक्ती एकावेळी 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकते. नोटा बदलण्याच्या प्रक्रियेबाबत आरबीआयच्या सूचनेनुसार सर्व बँकांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे बाजारातून 2000 च्या नोटा काढून घेण्याची घोषणा करताना RBI कडून असे सांगण्यात आले की, या नोटा सध्या कायदेशीर राहतील, तसेच मध्यवर्ती बँकेने सर्व बँकांना 2000 च्या नवीन नोटा जारी करू नयेत असे सांगितले आहे.

2016 मध्ये लाँच झाले… 2023 मध्ये बंद झाले

8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने देशात नोटाबंदीची घोषणा केली आणि तत्काळ प्रभावाने त्यावेळी बाजारात मोठा वाटा असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या होत्या. यानंतर आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. 2017 मध्ये या नोटाचं प्रमाण मोठं होतं. मार्च 2017 मध्ये दोन हजार रुपयांच्या सुमारे 89% नोटा मध्यवर्ती बँकेने जारी केल्या होत्या, परंतु 2018 मध्ये त्या कमी झाल्या आणि 31 मार्च 2018 रोजी 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा होता, एकूण नोटांमध्ये 37.3% शिल्लक होत्या, त्यामुळे त्यांची छपाई थांबवली होती. 31 मार्च 2023 रोजी बाजारात 2000 च्या नोटांचा वाटा फक्त 10.8% इतका कमी झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp