मुश्रीफांविरुद्ध कारवाई, यशवंत जाधवांना दिलासा?; 2 केसमध्ये साम्य काय?

ED action in Money Laundering case, Hasan Mushrif-yashwant Jadhav : हसन मुश्रीफांवर कारवाई झाल्यानंतर यशवंत जाधवांचं प्रकरण चर्चेत आलंय. काय आहे प्रकरण?
Money laundering case : action against hasan mushrif, but no action against yashwant jadhav
Money laundering case : action against hasan mushrif, but no action against yashwant jadhav

केंद्रीय यंत्रणा (central investigation agency) फक्त ठराविक पक्षाच्या नेत्यांना डोळ्यासमोर ठेवून कारवाई करत असतील तर ते योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते (leader of opposition) अजित पवार (ajit pawar) यांनी व्यक्त केली. विरोधकांकडून होणाऱ्या या टीकेला पुष्टी देणारं एक साम्य समोर आलंय. ते साम्य ED आणि IT ने 11 जानेवारीला कारवाई केलेले राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) हसन मुश्रीफ (hasan Mushrif) आणि शिंदे गटाचे नेते (Leader of Shinde Faction) यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर झालेल्या आरोपांवरुन झालेल्या तक्रारीत आहे. हे साम्य समजून घेऊयात...

भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नेते शिंदे गट आणि भाजपमध्ये दिसतात. भाजप काय वॉशिंग मशिन आहे की भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नेते पक्षात गेल्यावर त्यांचे आरोप धुवून निघतात, अशी टीका विरोधी पक्ष नेहमी करत असतात.

आता हीच चर्चा पुन्हा हसन मुश्रीफ यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर कोल्हापूर आणि पुणे इथे झालेल्या ईडी आणि आयटीच्या धाडीनंतर सुरू आहे. पण तुलना होतेय ती हसन मुश्रीफ आणि शिंदे गटाचे आमदार यशवंत जाधव यांची.

त्याचं कारण थोडक्यात सांगायचं तर सारखे आरोप असताना मुश्रीफांच्या प्रकरणात तक्रार झाली आणि कारवाईही झाली. मात्रन यशवंत जाधव यांच्या प्रकणात तक्रार होऊनही ED ने कोणतीही कारवाई केलेली नाही.
Money laundering case : action against hasan mushrif, but no action against yashwant jadhav
हसन मुश्रीफ, 2 कारखाने, 100 कोटी अन् सोमय्यांचे आरोप; समजून घ्या प्रकरण

आधी यशवंत जाधव आणि हसन मुश्रीफ यांची प्रकरणं काय आहेत ते जाणून घेऊयात...

कोल्हापुरातल्या अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात मुश्रीफांच्या नातेवाईकाच्या मालकीच्या व ताब्यात असलेल्या खासगी कंपनीच्या जी शेली कंपनी असल्याचाही आरोप करण्यात आला. अशा कंपनीच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा तक्रारीवरुन मुश्रीफांवर ED आणि IT ने धाड टाकत कारवाई केली.

यशवंत जाधवांवरही असेचं आरोप झाले होते, तेही साधारण सारख्याच काळात. महाविकास आघाडीच्या काळातच हे आरोप झाले होते. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळ्याच्या आमदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये जे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
Money laundering case : action against hasan mushrif, but no action against yashwant jadhav
Hasan Mushrif : कार्यकर्ता ते कोल्हापुरमधील राष्ट्रवादीचा चेहरा... हसन मुश्रीफ कोण आहेत?

याच प्रतिज्ञापत्रातून कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. याच कंपनीच्या माध्यमातून करण्यात झालेल्या व्यवहराबाबत चौकशी झाली होती.

या व्यवहारात प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडून एप्रिल महिन्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. तसंच त्यात प्राथमिक चौकशीही पोलीस स्टेशनने केली होती. त्यानंतर पोलिसांनी रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडूनच याबाबत अधिक माहिती मागवली होती.

हे सगळं एप्रिल महिन्यात झालं होतं त्यानंतर मात्र या प्रकरणात FIR ही रजिस्टर झाला नाही. पण या प्रकरणानंतर यशवंत जाधव शिंदे गटात गेल्या. त्यानंतर पुढे या प्रकरणात काहीच झालेलं नाही.

हसन मुश्रीफांवर झालेल्या आरोपातही रजिस्ट्रार ऑफ कंपनीने तक्रार केली होती. त्याची दखल घेत ED ने कारवाईही केली. म्हणजे या प्रकरणात रजिस्ट्रार ऑफ कंपनीने दिलेल्या प्रेडिकेट ऑफेन्सवरुन ED ने कारवाई केली.

Money laundering case : action against hasan mushrif, but no action against yashwant jadhav
यशवंत जाधव प्रकरण: IT छाप्यात सापडलेल्या 'डायरी'मध्ये 'मातोश्री'ला 2 कोटी, जाधव म्हणतात.. मातोश्री म्हणजे त्यांची आई!

म्हणजेच बनावट कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारावर रजिस्ट्रार ऑफ कंपनीने तक्रार नोंदवण्याचे आदेश देणं हे साम्य या दोन्ही प्रकरणात दिसतं. तर दुसरीकडे यामध्ये मुश्रीफांच्या प्रकरणात कारवाई आणि जाधवांच्या प्रकरणात कारवाई झालेली नाही.

हसन मुश्रीफांवर झालेल्या कारवाईनंतर विरोधी पक्षातल्या सर्वच नेत्यांनी प्रतिक्रियेत याचा उल्लेख केला आहे.

नऊ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनला कंपनीच्या रजिस्ट्रारकडून कंपनीच्या फसव्या नोंदणीसाठी बीएमसीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी संबंधित काही संशयास्पद कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध तक्रार आली आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, कंपनीचे निबंधक, मुंबई यांनी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून कंपनी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या संचालकांविरुद्ध तक्रार नोंदवण्यास सांगितले.

मुश्रीफांविरोधात कारवाई कोणत्या प्रकरणात झाली?

कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात त्यांच्या एका नातेवाईकाच्या मालकीच्या व ताब्यात असलेल्या खासगी कंपनीच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in