Sameer Wankhede: नवाब मलिकांचे आरोप खरे? CBI च्या FIR मध्ये स्फोटक माहिती
समीर वानखेडे यांनी काही संशयित आरोपांनी त्यांची कोणतीही माहिती न घेता सोडून दिले, असा ठपका सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर ठेवला आहे.
ADVERTISEMENT

एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी विभागाचे मुंबईचे माजी प्रादेशिक अधिकारी समीर वानखेडे हे भ्रष्टाचार प्रकरणात चांगलच अडकण्याची चिन्ह दिसत आहे. सीबीआयने तब्बल 25 कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात समीर वानखेडेंसह इतर काही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. CBI ने दाखल केलेल्या FIR मुंबई Tak ला मिळाली असून, यात गंभीर गोष्टींची नोंद करण्यात आली आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अशा काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केलेले आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
समीर वानखेडे आणि टीमने काही जणांना सोडून दिलं…
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. यात एक आरोप असा केला होता की, क्रूझवरील पार्टीत एक ड्रग्ज तस्करही होता. पार्टीत ठराविक लोकांवरच कारवाई करण्यात आली आणि इतरांना सोडून देण्यात आले. हा ड्रग्ज तस्कर समीर वानखेडेंचा मित्र असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.
हेही वाचा >> …म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं
दरम्यान, सीबीआयच्या एफआयआरमध्येही याबद्दल नोंद करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, मुंबई पोर्ट ट्र्स्टच्या गेटवरून बाहेर सोडताना आशिष रंजन यांच्याकडून अनेक प्रवाशांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी संशयित अरबाज ए. मर्चंट याने चरस लपवले असल्याची कबुली दिली. त्याने बुटात आणि झिपमध्ये लपवलेले पाऊच आशिष रंजन यांच्याकडे दिले.