सिंधुदुर्ग: मालवणमधील तारकर्ली दुर्घटनेप्रकरणी बोट मालकावर काय होणार कारवाई?

मालवणमधील तारकर्ली दुर्घटनेप्रकरणी बोट मालकासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने मालवण पोलिसांनी सातही जणांना अटक केली आहे.
seven people including boat owner arrested in connection with tarkarli accident malvan sindhudurg
seven people including boat owner arrested in connection with tarkarli accident malvan sindhudurg(फाइल फोटो

सिंधुदुर्ग: पर्यटन हंगाम सुरू असतानाच मालवणमधील तारकर्ली येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली होती. 20 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघा जणांचा मृत्‍यू झाला. या दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी आता बोट मालकासह सात जणांवर मृत्यूचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सातही जणांना तत्काळ अटकही करण्यात आली आहे.

याबाबतची तक्रार पर्यटक लैलेश प्रदीप परब (वय 36, रा.अणाव-कुडाळ) यांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय 52, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय 50 रा. देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल (वय 23, रा. देवबाग), विकी फिलिप फर्नांडिस (वय 32, रा. देवबाग), प्रथमेश रामकृष्ण बसंधकर (वय 31, रा. दांडी मालवण), तुषार भिकाजी तळवडकर (वय 39, रा. तारकर्ली), विल्यम फ्रान्सिस लुद्रीक (वय 54 रा. देवबाग) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नरळे हे करीत आहेत.

तारकर्लीच्या समुद्रात काल मंगळवारी स्कुबा डायव्हिंग बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांत मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करून पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे.

तारकर्ली समुद्रात बोट उलटून घडलेल्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. काल, सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली होती. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

seven people including boat owner arrested in connection with tarkarli accident malvan sindhudurg
Sindhudurga: मालवण हादरलं, तारकर्ली समुद्रात 20 पर्यटकांसह बोट बुडाली, दोघांचा मृत्यू

नेमकी घटना काय?

मालवणच्या तारकर्ली समुद्रात एक बोट वीस पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. स्कुबा डायव्हिंग करुन बोट परतत असतानाच किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर अचानक ही बोट बुडाली. ज्यामधील 20 पर्यटकही समुद्रात बुडाले. यापैकी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. तर दोन पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मे महिना सुरु असल्याने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. पर्यटकांची मोठी पसंती ही मालवणसह तारकर्लीला असते. तारकर्ली हे पर्यटनाचे माहेरघर मानले जाते. पुणे आणि मुंबईतुन एक ग्रुप पर्यटनासाठी तारकर्लीमध्ये आला होता. हे सगळेच 20 जण पर्यटक स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात गेले होते. स्कुबा डायव्हिंग आटपून हे पर्यटक तारकर्ली समुद्र किनाऱ्याच्या दिशेने परतत होते.

दरम्यान, अचानक सोसाट्याच्या वारा आल्याने स्कुबा डायव्हिंगची बोट अचानक समुद्रात पलटी झाली आणि यामधील सर्व 20 पर्यटक समुद्रात बुडू लागले. दरम्यान, वेळीच मदत मिळाल्याने बुडणाऱ्या 20 ही पर्यटकांना समुद्रकिनारी आणण्यात आलं. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर दोन जणांचा अंत झाला.

वीस जणांना तात्काळ मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. दोघे जण अतिशय गंभीर स्थितीमध्ये आहेत. यात उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा देखील समावेश आहे.

खरं तर पावसाळा जवळ आल्याने स्कुबा डायव्हिंग हे शासनाने बंद केले होते. पण स्थानिक व्यावसायिकाने स्वतःच्या अति आत्मविश्वासावर आजपासूनच पुन्हा स्कुबा डायव्हिंग सुरू केले होते. ज्यामुळे दोन जणांना हकनाक आपले प्राण गमावावे लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in