‘एकमेकांच्या पायात पाय घालून…’, सर्व जागा लढवण्याबद्दल शरद पवार काय बोलले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्ष सोडून जात आहेत, त्याचा फटका बसेल का?’, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला.
ADVERTISEMENT

Sharad Pawar News : राज्यात जागावाटपाबद्दलची चर्चा जोरात सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने भूमिका मांडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला. ‘महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांना पूर्ण जागा लढता येत नाही, हे अपयश वाटतं का?’, या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्ष सोडून जात आहेत, त्याचा फटका बसेल का?’, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “साधारणतः कोण जातंय, याचा आढावा घेतल्यानंतर फारशी चिंताजनक स्थिती आहे, असं वाटत नाही. मी जी माहिती घेतली, तर त्यात जे जात आहेत, त्यांच्याबद्दल चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही.”
राज्यातील हिंसक घटनावरून पवारांचे राज्य सरकारकडे बोट
राज्यात झालेल्या हिंसक घटनांवर बोलताना शरद पवार म्हणाले, “नगरला काहीतरी झालं. कोल्हापूरला कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. चुकीचा असेल, पण लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरूप देणं, हे काही योग्य नाही.”
“आज सत्ताधारी पक्ष आहे, तो अशा सगळ्या गोष्टींना प्रोत्साहित करतोय. राज्यकर्त्यांची जबाबदारी राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची आहे. पण, राज्यकर्तेच जर उतरायला लागले, त्यांचे सहकारीच उतरायला लागले. त्यातून दोन समाजांमध्ये, जातींमध्ये कटुता निर्माण व्हायला लागली, तर हे काही चांगलं लक्षण नाहीये”, अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली.