Sharad Pawar : “गौतम अदानींचं नाव घ्यावं लागेल, त्यांनी 25 कोटींचा चेक पाठवला”

मुंबई तक

आधी काँग्रेस आणि आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना अदानींविरोधात आक्रमक झालेली आहे. पण, त्यांचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा अदानींचं कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

Nationalist Congress Party President Sharad Pawar has once again praised industrialist Gautam Adani.
Nationalist Congress Party President Sharad Pawar has once again praised industrialist Gautam Adani.
social share
google news

-वसंत पवार, बारामती

Sharad Pawar Gautam Adani : दिल्लीपासून मुंबईपर्यंत विरोधी पक्ष अदानी यांचं नाव घेत मोदी सरकारला घेरताना दिसत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी अनेकदा पंतप्रधान मोदींनी उद्योगपती अदानींचं नाव घेऊन लक्ष्य केलं. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना अदानींविरोधात रस्त्यावर उतरलेली. पण, या दोन्ही पक्षांच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भूमिकेवरून अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. काँग्रेस आणि ठाकरेंची सेना एकीकडे अदानींविरोधात टीका करत आहे, तर शरद पवारांनी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले. पवारांनी मानलेल्या आभाराची आता चर्चा होत आहे. (Sharad Pawar express gratitude about Gautam adani)

बारामतीत विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबोटिक लॅबच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमात शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानींचा उल्लेख करत त्यांचे आभार मानले. ते नेमकं काय म्हणाले, हे वाचा…

25 कोटींचा चेक… शरद पवारांनी अदानींबद्दल काय सांगितलं?

या कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, “ज्याचा मी मगाशीच उल्लेख केला की भारतातले पहिलेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उभारणी आपण करत आहोत, त्याचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाला पंचवीस कोटी रुपये लागणार आहेत. या पंचवीस कोटींची उभारणी करून आम्ही या कामात उडी टाकली आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp