राज्यातील सत्तांतरानंतर शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ठाणे चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात दिवसभर दौरा करणार आहेत. ठाण्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेत शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्याबाबत शरद […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ठाणे चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात दिवसभर दौरा करणार आहेत.
ठाण्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेत शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्याबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपनं सत्ता स्थापन केली. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्याकडे आली असून, त्यामुळे ठाणे जिल्हा सत्तेचं केंद्रबिंदू बनला आहे.
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेत दोन गट (शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना) पडले आहेत. त्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेध राजकीय पक्षांना लागले असून, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणी सुरू केली आहे.