Sharad Pawar नी PM मोदींचे मानले आभार! गडकरी, गोयल, फडणवीसांचे टोचले कान
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी इस्रायल पॅलेस्टाईन मुद्द्यावरून भाजपचे नेते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, पीयूष गोयल यांच्यावर टीका केली. पवारांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
ADVERTISEMENT

Sharad Pawar-Narendra Modi, Palestine and Israel Conflict : शरद पवारांनी पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षावर मांडलेल्या भूमिकेनंतर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली. पण, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेने शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी आयते शस्त्र मिळालं. मोदींच्या भूमिकेवर बोट ठेवत शरद पवारांनी टिका केलेल्या भाजप नेत्यांचे शेलक्या शब्दात कान टोचले.
शरद पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या विधानाचा समाचार घेतला. पवार नेमकं काय बोलले, वाचा…
भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार काय बोलले?
शरद पवारांनी म्हटलं आहे की,”गेल्या काही दिवसांपासून X (आधीचे ट्विटर) व टीव्ही बाईट्द्वारे काही सल्ला आणि टिप्पण्या देण्यात आल्या. सदर टिप्पण्या माझ्या विधानाचा सखोल विचार न करता केलेल्या आहेत”, असं सांगत पवारांनी नितीन गडकरींपासून हिमंत बिस्वा सरमापर्यंत भाजप नेत्यांनी केलेल्या विधानांचा उल्लेख केला आहे.
कोणता भाजप नेता काय म्हणाला? पवारांनी ट्विट केली विधानं…
नितीन गडकरी – शरद पवारजी हे जाणतात की, ते एका विशिष्ट वर्गाला संतुष्ट करणारे विधान करत आहेत… त्यांचा संरचनात्मक दृष्टीकोन हवा.