22 March 2025 Gold Rate : खुशखबर! आजच करा सोनं खरेदी, सोन्या-चांदीच्या भावात 'इतक्या' रुपयांनी झाली घसरण

मुंबई तक

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आलंय.

ADVERTISEMENT

Today Gold And Silver Price
Today Gold And Silver Price
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आलंय. परंतु, भारतात आज शनिवारी 22 मार्चला सोन्याच्या दरात किरकोळ घट झाली आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90 हजार रुपयांच्या पार झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 82000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. 

मार्केट एक्सपर्टनुसार, येणाऱ्या पुढील काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. चांदीच्या भावत घसरण झाली आहे. चांदी प्रति किलोमागे एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. देशात एक किलोग्रॅम चांदीचे दर 1,02,900 रुपये झाले आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

दिल्ली

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90370 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 82850 रुपयांवर पोहोचली आहे.

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 90220 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 82700 रुपयांवर पोहोचली आहे.

हे वाचलं का?