Mumbai Fire Incident: मुंबईत आगडोंब! चेंबुर परिसरात भीषण आग, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
Mumbai Fire Incident Latest Update : मुंबईच्या शिवडी परिसरात भारत इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली. चेंबूरच्या सिर्धार्थ कॉलनीतील एका दुकानात लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईच्या चेंबूर परिसरात आग लागण्याचं कारण काय?
या भीषण आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल केलं, पण...
पोलीस आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली
Mumbai Fire Incident Latest Update : मुंबईच्या चेंबूर परिसरात एका दुकानात भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली. चेंबूरच्या सिर्धार्थ कॉलनीतील एका दुकानात लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याने आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवता आलं नाही. पोलीस आणि अग्निशमन विभागाला आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास या आगीच्या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर या विभागाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
एका इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर असलेल्या दुकानाला आग लागली आणि काही वेळातच या आगीनं रौद्ररुप धारण केलं, अशी माहिती आहे. या आगीच्या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत पती-पत्नी, दोन मुलं आणि कुटुंबातील एका अन्य सदस्याचा मृत्यू झाला. प्रेम गुप्ता (30), मंजू प्रेम गुप्ता (30), अनीता गुप्ता (39), नरेंद्र गुप्ता (10), पॅरिस गुप्ता (7) अशी मृतांची नावं आहेत.
हे ही वाचा >> Exit Poll Result : हरियाणा, काश्मीरात कुणाची सत्ता येणार? महाराष्ट्राकडे सर्वाचं लागलं लक्ष
इलेक्ट्रिक वायरिंगमुळे आग लागली?
इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशनमुळे इमारतीच्या दुकानात भीषण आग लागल्याचं समजते. ही इमारत एक-दोन मजल्यांची असून इमारतीच्या खाली एक दुकान होतं आणि वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहत होतं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> IND vs BAN : पहिल्या T20 आधी टीम इंडियाला मोठा झटका, 'हा' खेळाडू संघातून OUT
एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
या आगीच्या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत पती-पत्नी, दोन मुलं आणि कुटुंबातील एका अन्य सदस्याचा मृत्यू झाला. प्रेम गुप्ता (30), मंजू प्रेम गुप्ता (30), अनीता गुप्ता (39), नरेंद्र गुप्ता (10), पॅरिस गुप्ता (7) अशी मृतांची नावं आहेत. आगीत जखमी झाल्यानंतर या सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, डॉक्टरांनी पाच जणांनाही मृत घोषित केलं.
ADVERTISEMENT