8th April 2025 Gold Rate : बाईईई...काय हा प्रकार! दोन दिवसांपूर्वी स्वस्त झालेलं सोनं पुन्हा महागलं, आजचे दर काय?
Today Gold Rate : आज 8 एप्रिलला सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात झालेली घट आणि जगभरातील वाढत्या तणावाची परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांना सुरक्षित विकल्पांकडे खेचण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : आज 8 एप्रिलला सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात झालेली घट आणि जगभरातील वाढत्या तणावाची परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांना सुरक्षित विकल्पांकडे खेचण्यात आलं आहे. सोमवारी 'ब्लॅक मंडे'सारखी परिस्थिती आणि अमेरिकेच्या संभाव्य व्यापार युद्धाच्या बातम्यांमुळे जगभरात चिंतेचं वातावरण बनलं आहे. याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर झाला आहे.
कारण हे संकट काळात सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. एमसीएक्स (MCX) म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 87533 रुपये आणि चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 89033 रुपये नोंदविले गेले आहेत.
गुड्स रिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89730 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 82250 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89760 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 82280 रुपये झाले आहेत.










