सेक्स करताना तरुणाला आला Heart Attack! हार्ट पेशंटसाठी सेक्स करणं धोकादायक? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं
Heart Patient Died During Sex : नागपूरमध्ये 28 वर्षांच्या तरुणाला सेक्स करताना हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना घडली. बंगळुरुच्या उद्योगपतीचा सेक्स करताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हार्ट पेशंटसाठी सेक्स करणं धोकादायक?
लैंगिक क्षमता वाढवणारी औषधे किती धोकादायक?
डॉ. सुखविंदर सिंग यांनी दिली महत्त्वाची माहिती
Heart Patient Died During Sex : नागपूरमध्ये 28 वर्षांच्या तरुणाला सेक्स करताना हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना घडली. बंगळुरुच्या उद्योगपतीचा सेक्स करताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या तरुणाने सेक्स पॉवर वाढवण्यासाठी औषधांचा सेवन केलं आणि त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. अशातच एक सवाल उपस्थित होतो की, हार्ट पेशंटसाठी सेक्स करणं जीवघेणं होऊ शकतं? सेक्स वर्धक औषधेही धोकादायक ठरू शकतात? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
अशा बातम्या समोर आल्यानंतर हार्ट पेशंटच्या मनात भीती निर्माण होते की, सेक्स करणं धोकादाय होऊ शकतं. ज्या रुग्णांना हार्ट अटॅकला येऊन गेला आहे, त्यांच्या मनात याबाबत भीती वाढली आहे. परंतु, या गंभीर समस्येबाबत सिबिया मेडिकल सेंटर, लुधियानाचे डायरेक्टर आणि कार्डियोलॉजिस्ट डॉ. सुखविंदर सिंग यांनी 'द लल्लन टॉप' चॅनेलशी बोलताना सविस्तर माहिती दिलीय. त्यांनी सांगितलं की, हार्ट पेशंट नेहमी विचारतात की आम्ही सेक्स करू शकतो का?, तर याचं उत्तर हो किंवा नाही असं म्हणता येणार नाही. सिंग यांनी सांगितलं की, पेशंटची समस्या काय आहे, यावत ते अवलंबून असतं.
हार्ट पेशंटसाठी सेक्स करणं धोकादायक?
डॉ. सुखविंदर यांच्या माहितीनुसार, सेक्स हार्ट पेशंटसाठी धोकादायक होऊ शकतो. परंतु, घाबरण्यासारखी गोष्ट नाही. सेक्स करताना योग्य ती काळजी घेतली किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर कोणतीही समस्या निर्माण होत नाही. सेक्स दरम्यान हार्ट अटॅक येणे, असं खूप कमी वेळा घडतं.
हे ही वाचा >> Nashik Crime : नाशिकमध्ये भरदिवसा मुलीचं अपहरण, व्हायरल CCTV व्हिडीओच्यामागे निघाली वेगळीच घटना
डॉ. सुखविंदर यांच्या माहितीनुसार, हार्ट पेशंट सेक्स करण्यासाठी किती फिट आहेत, ते स्वत: तपासू शकतात. पेशंटला माइल्ड हार्ट डिसीज असेल, त्याने दोन फ्लोअरपर्यंत पायऱ्या चढून पाहावं की, त्यांना हार्टचा त्रास होतोय की नाही..जर त्यांनी आरामात दोन फ्लोअर पायऱ्या चढल्या. तर ते सामान्यपणे सेक्स करू शकतात.
