Akola Violence : दगडफेक-जाळपोळ अन् गोळीबार; दोन गटात तुफान राडा का झाला?
akola violence : अकोला शहरात शनिवारी (13 मे) रात्री हिंसेची ठिणगी पडली. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेला जमाव हिंसक झाला आणि तोडफोड सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूचा जमाव आला आणि वाद पेटला. दगडफेक आणि प्रचंड जाळपोळ दोन्ही गटांनी केली.
ADVERTISEMENT

akola violence news : अकोला शहरात शनिवारी (13 मे) रात्री हिंसेची ठिणगी पडली. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेला जमाव हिंसक झाला आणि तोडफोड सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूचा जमाव आला आणि वाद पेटला. दगडफेक आणि प्रचंड जाळपोळ दोन्ही गटांनी केली. जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं असून, शहरातील तीन पोलीस ठाणे क्षेत्रात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. या घटनेत काही नागरिक जखमी झाले आहेत.
अकोला शहरात झालेल्या या हिंसेला एक सोशल मीडियावरील पोस्ट कारणीभूत ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर एका धर्माच्या धर्मगुरूबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. इन्स्टाग्राम लिहिण्यात आलेली पोस्ट व्हायरल झाली.
अकोल्यात हिंसाचार कसा सुरू झाला?
त्यानंतर या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी लोकांचा एक गट पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी गटाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेतला, मात्र त्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर या गटाने अचानक वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. जमाव हिंसक झाला आणि दगडफेकही सुरू केली.
हा प्रकार सुरु झाल्यानंतर तिथे दुसरा गटाचे लोक आले. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आणि दोन्ही बाजूंनी प्रचंड दगडफेक सुरू झाली. जवळपास तासभर ही दगडफेक सुरू होती.