Amravati Sex Scandal : आरोपी अयानसह पोलीस गावात दाखल, मित्राच्या घरातून मोबाईल फोन केले जप्त...

मुंबई तक

Amravati Sex Scandal : अमरावतीच्या परतवाडा सेक्स स्कँडल प्रमाणात पोलिसांनी मुख्य आरोपी अयान अहमद याला आपल्या ताब्यात घेतले आणि गावातील त्यांच्या मित्रांची माहिती मिळवत त्यांचे मोबाईल फोन जप्त केले. व्हायरल व्हिडिओशी संबंधित डिजीटल पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

ADVERTISEMENT

Amravati Sex Scandal
Amravati Sex Scandal
google news

बातम्या हायलाइट

point

सेक्स स्कँडलचं संपूर्ण प्रकरण बाहेर काढण्यासाठी मोबाईल फोन फायदेशीर

point

मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार...

Amravati Sex Scandal : अमरावतीच्या परतवाडा सेक्स स्कँडल प्रमाणात पोलिसांनी मुख्य आरोपी अयान अहमद याला आपल्या ताब्यात घेतले आणि गावातील त्यांच्या मित्रांची माहिती मिळवत त्यांचे मोबाईल फोन जप्त केले. व्हायरल व्हिडिओशी संबंधित डिजीटल पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी शोध सुरु केला आहे. अशातच पोलिसांनी अयानला अचलपुर येथील सरमसपुरा पोलीस ठाणे परिसरात ताब्यात घेत अटक केली. 

हे ही वाचा : कोल्हापूर : व्याजाच्या पैशाच्या बदल्यात शारीरिक संबंध, नग्न व्हिडीओ शूट करुन महिलेवर 3 वर्ष अनन्वित अत्याचार

सेक्स स्कँडलचं संपूर्ण प्रकरण बाहेर काढण्यासाठी मोबाईल फोन फायदेशीर

हे प्रकरण आणखीच गंभीर होऊल गेलं, व्हायरल व्हिडिओत दिसत असलेल्या थार गाडीत असलेले मोबाईल फोन या प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे आहेत. याच मोबाईलचा तपास करण्यासाठी पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले, तिथून पोलिसांनी मोबाईल फोन जप्त केले. पोलिसांचं म्हणणं असं की, सेक्स स्कँडलचं संपूर्ण प्रकरण बाहेर काढण्यासाठी मोबाईल फोन फायदेशीर ठरेल.  

मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार...

या कारवाई दरम्यान, पोलीस अधिकारी आणि पोलिसाचे पथक दाखल झाले होते. जेव्हा पोलीस आरोपीला घेऊन गावात पोहोचले, तेव्हा स्थानिकांची गर्दी जमली. अशा स्थितीत पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक मोबाईल फोन जप्त केले, हे प्रकरण संबंधित पुरावे असण्याची अधिक शक्यता आहे. संबंधित व्हिडिओ कसे बनवले गेले, ते कोणापर्यंत पोहोचले आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोण सामिल आहे, हे निश्चित करण्यासाठी हे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील. 

पोलिसांच्या तपासातून असे उघडकीस आले की, हे प्रकरण केवळ व्हायरल व्हिडिओपुरते मर्यादीत नसून, त्यामागील एक संघटित नेटवर्क असण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिजिटल माध्यमांचा वापर करून होणारे ब्लॅकमेंलिंग आणि इतर कारवायांचाही तपास सुरु करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?