मंदिराच्या पायऱ्या पुसल्या अन अमृता फडणवीस झाल्या ट्रोल; बघा काय घडलं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Amruta Fadnavis Get Trolled after wiping the steps of Ram temple video Viral
Amruta Fadnavis Get Trolled after wiping the steps of Ram temple video Viral
social share
google news

Amruta Fadnavis Viral Post : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी रविवारी, १४ जानेवारी रोजी मुंबईतील सर्वात जुन्या झावबा राम मंदिराच्या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. अमृता फडणवीस आणि जॅकी श्रॉफ मंदिराची स्वच्छता करतानाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. (Amruta Fadnavis Get Trolled after wiping the steps of Ram temple video Viral)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या धावपळीत अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि समाजाच्या सर्व स्तरातील सेलिब्रेटी भारतभरातील मंदिरांच्या स्वच्छतेत सहभागी झाले आहेत.

वाचा : Rajan Salvi “मला अटक करा, जेलमध्ये टाका, पण बायको…”, ठाकरेंच्या आमदाराचा दाटला कंठ

अमृता फडणवीस नेहमी त्यांची गाणी, स्वच्छता आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. पण यावेळी त्यांच्या चर्चेचं कारण मंदिरातील स्वच्छता आहे. व्हायरल व्हिडीओने यूजर्सचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच नाशिकमधील काळाराम मंदिरात मोदी स्वच्छता करतानाचा एक फोटो या दौऱ्यातील लक्षवेधी क्षणांपैकी एक ठरला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमृता फडणवीस यांच्या पोस्टवर ट्रोलर्संची खोचक टीका

अमृता फडणवीस यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना काहींनी कौतुक केलं आहे तर अनेकांनी ‘स्वच्छ जागेची स्वच्छता करण्यात काय मोठेपणा’ असे म्हणत उलटप्रश्न केले आहे.

वाचा : Sushil Kumar Shinde : भाजपची ऑफर की काँग्रेसविरोधात रणनीती! शिंदेंच्या गौप्यस्फोटाचा अर्थ काय?

तसंच काही यूजर्सनी सल्ला दिला की, ‘स्वच्छ जागेवर स्वच्छता करण्यापेक्षा महापालिकेचे टॉयलेट्स स्वच्छ करा. गड- किल्ले, मुंबईतील झोपडपट्ट्या यांच्या स्वच्छतेकडे पण लक्ष द्या. हे सगळं नाटक आहे स्वतः घरामध्ये एक ग्लास तरी धुता का?’ अशी खोचक टीका केली.

ADVERTISEMENT

वाचा : Pregnant Job : ‘महिलांना प्रेग्नेंट करा अन् पैसे कमवा’; सुखातील जॉबच्या मोहात अडकलात तर…

व्हिडीओ शेअर करत अमृता यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पंतप्रधान मोदी यांनी भारतवासीयांना मंदिराच्या स्वच्छतेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरातील मंदिरांना स्वच्छ ठेवण्याच्या त्यांच्या आवाहनानुसार आज मुंबईतील प्राचीन राम मंदिराला आम्ही भेट दिली. स्वच्छता ही देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असे म्हटले जाते त्याचा इथे अनुभव आला. आज मनःशांती व देवळातील पावित्र्य जवळून अनुभवता आले. आम्ही खरंच धन्य झालो.” मकरसंक्रांतीच्या निमित्त अमृता फडणवीस यांनी या मंदिरात भेट दिली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT