ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार नाही, तर... -देवेंद्र फडणवीस
Baramati Lok Sabha election 2024, Devendra Fadnavis Speech : सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरताना देवेंद्र फडणवीसांचे भाषण.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सुनेत्रा पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात भाषण
सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं फडणवीसांचं आवाहन
Baramati Lok Sabha election, Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या पत्ना सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत बोलताना शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत भाषण केले. (Devendra Fadnavis appeal to voter That cast vote to sunetra pawar)
ADVERTISEMENT
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी नाही. ही लढाई सुनेत्रा ताई विरुद्ध सुप्रिया ताई नाही. कारण ही लोकसभेची निवडणूक आहे. ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेची, विधानसभेची निवडणूक नाहीये."
शरद पवार, सुप्रिया सुळे नेते बनणार नाहीत -फडणवीस
"ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. कुणाच्या हातात देश द्यायचा याचा निर्णय करण्याची ही निवडणूक आहे. या निवडणुकीने शरद पवार, सुप्रिया ताई हे नेते बनणार नाहीत. या निवडणुकीने अजित पवार उपमुख्यमंत्र्यांचे केंद्रात जाणार नाही. या निवडणुकीत एवढंच पाहायचे आहे की, बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूने उभा राहतो की, राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो", असे सांगत फडणवीसांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं.
हे वाचलं का?
"विकासाला मत द्यायचं आहे की, विनाशाला मत द्यायचं आहे, हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. या निवडणुकीत वेगवेगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होईल. वेगवेगळ्या भावना सेट करायचा प्रयत्न होईल. आपल्याला विचलित व्हायचं नाहीये, मोदींना मतदान करायचं आहे. मोदींना मतदान करण्यासाठी सुनेत्रा ताईंना निवडून द्या", असे फडणवीस म्हणाले.
सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी अर्ज भरताना कुणी काय केलं भाषण... पहा व्हिडीओ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT