Praful Patel : "शरद पवार भाजपसोबत येण्यास 50 टक्के तयार झाले होते, पण..."
Praful patel Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतविभाजनामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात पक्षाच्या निवडणूक चिन्हावर हक्क सांगण्यावरून वाद सुरू झाला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रफुल पटेल यांच्या विधानाने नवी चर्चा

शरद पवारांबद्दल पटेल काय बोलले?
Sharad Pawar Praful Patel : गेल्या वर्षी जेव्हा अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा शरद पवारही सरकारसोबत जाण्यास '५० टक्के' तयार होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. गेल्या वर्षी २ जुलै रोजी अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील 8 नेते भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये मंत्री झाले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी 'एनआयए'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, '2 जुलै 2023 रोजी अजित पवार आणि आमचे नेते महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 15 आणि 16 जुलै रोजी आम्ही शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना आमच्यासोबत येण्याची विनंती केली. तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचे आहे, असे आम्ही सांगितले. पुढे अजित आणि शरद पवार यांची पुण्यात भेट झाली. मला विश्वास आहे की शरद पवार 50 टक्के तयार होते."
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काय दिले उत्तर?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतविभाजनामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात पक्षाच्या निवडणूक चिन्हावर हक्क सांगण्यावरून वाद सुरू झाला होता. सरतेशेवटी, फेब्रुवारीमध्ये निकाल देताना निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला 'खरा' राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केलं होतं.
हेही वाचा >> शरद पवारांना माढ्यात मिळाला उमेदवार, भाजपच्या विजयाचा मार्ग खडतर?
निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' असे नवे नाव दिले होते. मात्र, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी प्रफुल्ल पटेल यांचे विधान निरर्थक असल्याचे म्हटले आहे.