Aryan Khan drugs case : समीर वानखेडेंचा 25 कोटी खंडणीचा डाव एका फोटोने उधळला! वाचा इनसाईड स्टोरी
एनसीबीच्या दक्षता चौकशीत वानखेडेंबाबत अनेक मोठे खुलासे झाले आहेत. तसेच कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारीचा संपूर्ण कट कसा रचला गेला आणि 25 कोटी रुपये वसूल करण्याचे नियोजन कसे केले गेले होते, याबद्दलही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) अर्थात अमली पदार्थ विरोधी विभागाचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. एनसीबीच्या दक्षता चौकशीत वानखेडेंबाबत अनेक मोठे खुलासे झाले आहेत. तसेच कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारीचा संपूर्ण कट कसा रचला गेला आणि 25 कोटी रुपये वसूल करण्याचे नियोजन कसे केले गेले होते, याबद्दलही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (aryan khan drugs case inside story : what was plan of sameer wankhede to extort money from pooja dadlani)
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीने समीर वानखेडेंसह काही अधिकाऱ्यांची दक्षता चौकशी लावली होती. एनसीबीच्या या दक्षता चौकशी अहवालाच्या आधारे सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. दक्षता तपासाशी संबंधित सूत्रांनी ‘आज तक’ला समीर वानखेडे आणि आर्यन खान अटक प्रकरणातील महत्त्वाची माहिती दिली.
कोण आहे सॅमविल डिसोझा?
समोर आलेल्या तपशिलानुसार, एनसीबीच्या दक्षता पथकाती एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे समविल डिसोझा याने वानखेडेंबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. डिसोझा हा ड्रग्ज सप्लायर होता. समीर वानखेडे यांच्या एनसीबीच्या पथकाने एलएसडी ड्रग्जच्या गुन्ह्यात त्याला पकडले होते. त्यादरम्यान समीर वानखेडे आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनीही 10 लाखांची लाच घेतल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा >> आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, शाहरुख खान-समीर वानखेडेंचं WhatsApp चॅट जसंच्या तसं
आरोपांनुसार हे पैसे व्हीव्ही सिंग आणि समीर वानखेडे यांनी स्वत: घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नंतर समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने डिसोझालाच त्यांचा खबरी बनवलं. यानंतर तो वानखेडेच्या टीमसाठी माणसं शोधू लागला. इतकेच नाही तर एनसीबीच्या या पथकाने बनावट ड्रग्ज कटात डिसोझाचाही वापर केल्याचा आरोप आहे.