Ayodhya Ram Mandir: शिंदे सरकारचा मोठा निर्णय, 22 जानेवारीला महाराष्ट्रात…

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

ayodhya ram mandir big decision of shinde government january 22 declared as government holiday in maharashtra
ayodhya ram mandir big decision of shinde government january 22 declared as government holiday in maharashtra
social share
google news

Ram Mandir Pran Pratishtha Maharashtra government holiday: मुंबई: अयोध्येतील राम मंदिराचा ‘प्राण प्रतिष्ठा’ (अभिषेक सोहळा) होणार असताना म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील शिंदे सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मंगल प्रभात लोढा यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (ayodhya ram mandir big decision of shinde government january 22 declared as government holiday in maharashtra)

सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाने या प्रस्तावावर नकारात्मक प्रतिक्रिया देत, अशी कोणतीही पूर्वतयारी नसल्याने अशा कार्यक्रमासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करता येणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, अंतिम मंजुरीसाठी ही फाईल मुख्यमंत्री कार्यालयात सादर करण्यात आली. ज्यानंतर सुट्टीचा निर्णय घेण्यात आला.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन 2024 सालासाठी खाली नमूद केलेला दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करीत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुट्टीचा दिवस – श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिन (दिनांक: 22 जानेवारी 2024)

या 8 राज्यांमध्ये 22 जानेवारीला असेल सुट्टी

1. उत्तर प्रदेश- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. तसेच त्यादिवशी राज्यभरात दारूची दुकानेही बंद राहणार आहेत.

ADVERTISEMENT

2. मध्य प्रदेश- मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 22 जानेवारीला मध्य प्रदेशात शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जात आहे. दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करतानाच मोहन यादव यांनी राज्यात 22 जानेवारी हा ‘ड्राय डे’ म्हणून घोषित केला आहे. ते म्हणाले, ‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही 22 जानेवारी हा दिवस राज्यात ‘ड्राय डे’ मानण्याचा निर्णय घेतला आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Ram Mandir: शंकराचार्यांचा नारायण राणेंवर पलटवार, राम मंदिरावरून मोठं राजकारण

3. गोवा- गोवा सरकारने 22 जानेवारीला अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी आणि शाळांना 22 जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, ‘शाळांसह केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी असेल.’

4. छत्तीसगड- अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीचा अभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी छत्तीसगड सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली. ‘सर्व जग सियारामला ओळखते. जमेल तितके मी तुला नमस्कार करतो. अयोध्येतील भगवान श्री राम मंदिराच्या स्थापना दिनी 22 जानेवारी रोजी छत्तीसगडमधील सर्व सरकारी आणि गैर-सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असेल.’

5. हरियाणा- हरियाणा सरकारनेही राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तसेच, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी राज्यात कुठेही मद्यपान करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

6. उत्तराखंड- उत्तराखंडमधील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 22 जानेवारीला सुट्टी असेल. तसेच राज्य सरकारची सर्व शासकीय कार्यालये दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. राज्य सरकारने ही घोषणा केली आहे.

हे ही वाचा>> Ram Mandir: रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी करावेच लागणार ‘हे’ विधी!

7. गुजरात- गुजरातच्या भूपेंद्र पटेल सरकारनेही या दिवशी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील जनतेला उत्सवात सहभागी होता यावे यासाठी राज्य शासनाची सर्व कार्यालये व संस्था 22 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत बंद राहतील.

8. राजस्थान- राजस्थानमध्ये 22 जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी असणार आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. राजस्थानमध्ये 22 जानेवारी हा ड्राय दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. 22 जानेवारीला दारू आणि मांसाची दुकाने बंद राहतील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT