Manoj Jarange : 'जरांगेंमागे शरद पवार, टोपेंचा हात, पोलिसांवर दगडफेकही...', पाटलांवर खळबळजनक आरोप
Baburao Walekar big allegation on Manoj jarange patil : मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर आरोप करण्यासाठी आता त्यांचेच मराठा सहकारी कार्यकर्ते समोर आले आहेत. 'मनोज जरागेंच्या आंदोलनाला शरद पवार आणि राजेश टोपेंनीच हात दिला आहे, हे मी 100 टक्के पुराव्यानिशी सांगतो', असा दावा जरागेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी आरोप करताना केला आहे.
ADVERTISEMENT
Baburao Walekar big allegation on Manoj jarange patil : मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर आरोप करण्यासाठी आता त्यांचेच मराठा सहकारी कार्यकर्ते समोर आले आहेत. 'मनोज जरागेंच्या आंदोलनाला शरद पवार आणि राजेश टोपेंनीच हात दिला आहे, हे मी 100 टक्के पुराव्यानिशी सांगतो', असा दावा जरागेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी आरोप करताना केला आहे. तसेच अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्यासही जरांगेंनी (Manoj jarange patil) सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (baburao walekar big allegation on manoj jarange patil maratha reservation sharad pawar rajesh top antwarwali sarati)
मनोज जरांगे पाटील यांच्या तीन जुन्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेवर खळबळजनक आरोप केला आहे. या सहकाऱ्यांमधील एक बाबुराव वाळेकर म्हणतो, मी जरांगेंचे जुना सहकारी आहे, मी त्यांच्यासोबत 18 वर्षापासून काम केले आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी तरूणांचा कसा वापर करायचा हा मनोज जरांगेंना चांगला अभ्यास आहे, असे वाळेकर म्हणाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Manoj jarange : 'उद्धव ठाकरे, शरद पवारांची स्क्रिप्ट जरांगेंच्या...'
वाळेकर पुढे म्हणतो, 'मी 100 टक्के पुराव्यानिशी सांगतो, जरांगेंना शरद पवार आणि टोपे साहेबांनीच हात दिलेला आहे, तुम्ही त्याच्याशिवाय इथे पोहोचू शकत नाही, तुम्ही फक्त समाजाची ढाल करता आणि वापर करून घेता, असा खळबळ उडवून टाकणारा आरोप वाळेकर यांनी जरांगेंवर केला आहे.
तसेच दंगल व्हायच्या आधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला येऊन सांगितलं जरांगे पाटलांनी असा मेसेज दिला आहे, इथे जर अशा घटना घडल्या तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकता. या माणसाने (जरांगेंने) महिलांना सुद्धा ढाल बनवले, महिला सुद्धा बोलवून घेतल्या आणि स्वत:ला कडा बसवून घेतला, आज ज्या महिलांना पोलिसांचा मार बसलाय त्याला जरांगे पाटील जबाबदार असल्याचा आरोप वाळेकरने जरांगेंवर केला आहे.
हे ही वाचा : '...नाहीतर मरून माघारी येणार', गाडी अडवताच जरांगे रडले!
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT