Video : ''भारतात पासपोर्ट, व्हिसाशिवाय घुसखोरी,'' युट्यूबरच्या 'या' व्हिडिओने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

bangladeshi youtuber shows how to enter india without passport and visa video
बांग्लादेश युट्यूबरच्या व्हिडिओने खळबळ
social share
google news

बातम्या हायलाइट

point

व्हिडिओत युट्यूबर भारत बांग्लादेशची बॉर्डर दाखवतोय

point

व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

point

भारतातील सीमाभागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला

Bangladeshi Youtuber Video : भारतात गैरमार्गाने घुसखोरी करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. यामध्ये बांग्लादेशमधून सर्वाधिक घुसखोरी होते असे बोलले जाते. असे असताना आता एका युट्यूबरने बांग्लादेशमधून गैरमार्गाने भारतात कसे दाखल व्हायचे? या संदर्भात एक व्हिडिओ बनवला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय कशी घुसखोरी करायची अशी माहिती या व्हिडिओत देण्यात आली आहे. व्हिडिओत युट्यूबर भारत बांग्लादेशची बॉर्डर दाखवत आहे, त्यानंतर कशाप्रकारे ही बॉर्डर पार करून भारतात घुसखोरी करायची हे सांगत आहे? या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. त्याचसोबत या व्हिडिओने भारतातील सीमाभागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (bangladeshi youtuber shows how to enter india without passport and visa video) 

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर एका यु्ट्यूबरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत युट्यूबर पासपोर्ट आणि व्हिसाशिवास भारतात कशी घुसखोरी करायची? याची माहिती सांगत आहे. हा युट्यूबर बांग्लादेशमधल्या भाषेत बोलत आहे. आणि बांग्लादेशमधून भारतात कोणताही पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय कसं जायचं. या संदर्भात माहिती देत आहे. 21 मिनिटाच्या या व्हिडिओत तो संपूर्ण मार्ग सांगत आहे. 

हे ही वाचा : Ajit Pawar : ''अजित दादांसारख्या व्यक्तीमत्वाला तोंड लपवून...'', ठाकरेंच्या नेत्याची बोचरी टीका

युट्यूबर या व्हिडिओत सूरूवातील एका साईन बोर्डाच्या येथे उभा आहे. आणि बांग्लादेशची बॉर्डर कुठे संपते आणि भारताची बॉर्डर कुठे सुरु होते? याबाबतची माहिती देतो. त्यानंतर तो बाईकने अनेक अंतर प्रवास करतो.या प्रवासानंतर युट्यूबर बॉर्डर दाखल होतो. बॉर्डरवरून अनेक अंतर चालल्यानंतर तो भारतीतल बीएसफचं पोस्टही दाखवून. त्यानंतर काही अंतर चालल्यानंतर एक नाळा येतो. या नाळ्याच्या मार्गातून तो भारतात घुसखोरी करता येईल असा दावा करतो आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान, या यूट्यूबरने आपल्या व्हिडीओमध्ये बांगलादेशातून भारतात कोणत्याही पासपोर्ट वा व्हिसाशिवाय छुप्या मार्गाने जाणं शक्य असल्याचा दावा केला आहे. हे अत्यंत धोकादायक असून या युट्युबरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवाय सीमाभागातही केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा : Yashshree shinde : यशश्रीच्या मृतदेहाचे कुत्रे तोडत होते लचके; पोलीस पोहोचले त्यावेळी काय दिसलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT