Beed : बबन गित्तेंनी डोक्यात घातली गोळी, परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या कशी झाली?
Beed News : परळीत झालेल्या हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांची भरवस्तीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सरपंच बापू आंधळेंची हत्या कशी झाली?

परळीमध्ये अजित पवार गटाच्या सरपंचाची हत्या

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा
Beed Crime News : (रोहिदास हातागळे, बीड) परळीत शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे यांना गोळ्या घालून जीवे मारण्यात आले. या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण काय आणि हत्येचे कारण काय? हेच समजून घ्या... (why NCP's Ajit Pawar Faction Sarpanch bapu Andhale shot dead by accused)
फिर्यादीत दिलेल्या माहितीप्रमाणे, 29 जून रोजी रात्री 8.30 वाजता ही घटना घडली. आरोपींनी कट रचून मयत बापू आंधळे आणि ग्यानबा गित्ते यांना आरोपी महादेव गित्ते यांच्या परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावले.
तिथे बबन गित्ते मयत बापू आंधळे यांना म्हणाले की, 'आय#@ तू पैसे आणलेस का?' त्यावर बापू आंधळे म्हणाले की, 'आईवरून शिव्या देऊ नका.'
बबन गित्तेंनी पिस्तूल काढले अन् डोक्यात मारली गोळी
बापू आंधळेंनी शिवीगाळ करू नका असे म्हणताच बबन गित्तेंनी कमरेला असलेले पिस्तूल काढले आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली. तितक्यात राजाभाऊ नेहरकरने आंधळेंच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यातच आंधळे यांचा जागेवरच मृत्यू झाला.