विकृती म्हणावं सूड? कर्ज काढून द्राक्ष बाग फुलवली, अज्ञात व्यक्तीने विषारी औषध फवारुन उद्धवस्त केली

मुंबई तक

Barshi Farmer vineyard News : विकृती म्हणावं सूड? कर्ज काढून द्राक्ष बाग फुलवली, अज्ञात व्यक्तीने विषारी औषध फवारुन उद्धवस्त केली

ADVERTISEMENT

Barshi Farmer vineyard News
Barshi Farmer vineyard News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विकृती म्हणावं सूड? कर्ज काढून द्राक्ष बाग फुलवली

point

अज्ञात व्यक्तीने विषारी औषध फवारुन उद्धवस्त केली

Barshi Farmer vineyard News : बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यावर महापूराच्या अस्मानी संकटानंतर सुलतानी संकट ओढावलंय. शेतकऱ्याने कर्ज काढून आणि काबाड कष्ट करुन फुलवलेली द्राक्षबाग त इसमानं विषारी औषधाची फवारणी करत उद्धवस्त केली आहे. दरम्यान, द्राक्ष बाग उध्वस्त झाल्यानंतर शेतकरी महिलेचा काळीज पिळटवून टाकणारा आक्रोश केलेला पाहायला मिळालाय. 

अज्ञात इसमाच्या कृत्याने शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चुराडा झालाय. अज्ञात इसमाने बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात द्राक्षबाग उद्ध्वस्त केली आहे. शेतकरी महिलेचा काळीज पिळटवून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. कर्ज काढून द्राक्ष बाग फुलवली आणि अज्ञात इसमाने सर्व काही उध्वस्त केले आहे. जवळपास एक एकर द्राक्ष बागेवर विषारी औषध फवारणी केले आहे. त्यामुळे छाटणीला आलेली द्राक्षबाग वाया गेली आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात घडली आहे.

हेही वाचा : विधवा महिलेशी लग्न केलं अन् नंतर पत्नीला 'ते' टोमणे... वाद विकोपाला गेला अन् रागाच्या भरात इस्त्रीने जाळलं!

शेतकरी महिलेचा काळीज पिळटवून टाकणारा आक्रोश

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अनिता किरण बर्डे या परिश्रमी शेतकऱ्याच्या द्राक्षबागेवर अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक गळून पडल्याने बर्डे कुटुंब हतबल झाले आहे.अनिता किरण बर्डे उध्वस्त झालेल्या द्राक्ष बागेत आक्रोश व्यक्त करत असल्याच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp