विधवा महिलेशी लग्न केलं अन् नंतर पत्नीला 'ते' टोमणे... वाद विकोपाला गेला अन् रागाच्या भरात इस्त्रीने जाळलं!
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विधवा महिलेशी लग्न केलं अन्...
पत्नीला 'ते' टोमणे मारले अन् वाद विकोपाला गेला
रागाच्या भरात इस्त्रीने जाळलं!
Crime News: देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. मध्य प्रदेशातील जबलपुरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
खरंतर, ही संपूर्ण घटना माढोताल पोलीस स्टेशन हद्दीतील रैंगवा गावात घडल्याची माहिती आहे. येथे एका 37 वर्षीय शिल्पी तिवारी नावाच्या महिलेने माढोताल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिचा पती अरविंद तिवारी, दीर आशुतोष तिवारी आणि तिची जाऊ शांती बाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. शिल्पीने तक्रार करताना सांगितलं की, बढेयाखेडा पाटण येथील या रहिवासी असलेल्या महेंद्र तिवारी नावाच्या तरुणासोबत तिचं पहिलं लग्न झालं होतं. मात्र, जवळपास सहा महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचा मृत्यू झाला. पहिल्या लग्नापासून पीडितेला 15 वर्षांता मुलगा असून पतीच्या मृत्यूनंतर, तिने जुलै 2025 मध्य अरविंद तिवारीसोबत दुसरं लग्न केलं.
हे ही वाचा: फ्रेशर्स पार्टीमध्ये तरुणाला बेदम मारहाण अन् निर्घृण हत्या.. लातूरच्या खाजगी कॉलेजमध्ये नेमकं काय घडलं?
सासरच्या लोकांचे सतत टोमणे...
पीडितेने पोलिसांना पुढे सांगितलं की, सासरचे लोक तिला नेहमी पहिल्या पतीच्या मृत्यूवरून टोमणे मारायचे. दिवाळीच्या दिवशी दुपारच्या सुमारास पीडितेचा तिच्या पतीसोबत मोठा वाद झाला आणि यादरम्यान आरोपी पतीने पत्नीला इस्त्रीने जाळलं. पीडित महिलेने दीर आणि तिच्या जाऊवर सुद्धा गंभीर आरोप केले आहेत. त्यावेळी, घरातील तिन्ही सदस्यांनी मिळून पीडितेला बेदम मारहाण केल्याचं महिलेनं तक्रार करताना सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हे ही वाचा: "पत्नीचे तीन बॉयफ्रेंड्स..." जावयाने सासऱ्याकडे केली तक्रार पण, उलट उत्तर मिळालं अन् रागाच्या भरात चुकीचं पाऊल...
अशा प्रकरणांमध्ये वाढ
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलांसाठी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ झाली असली आणि कठोर कायदे जरी लागू झाले असले, तरी जोपर्यंत समाजाची अशा प्रकरणाबाबत विचारसरणी बदलत नाही आणि महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागृत तसेच, सक्षम केलं जात नाही तोपर्यंत अशा घटना वाढत राहतील. घरगुती हिंसाचाराची सुरुवात मानसिक छळापासून होते आणि जर त्याला वेळीच विरोध केला नाही तर तो शारीरिक हिंसाचारात बदलत असल्याचं शिल्पी तिवारीच्या या प्रकरणावरून स्पष्ट होतंय.









