Beed Accident : ट्रकला धडकून पिकअपचा चक्काचूर, बाप-लेकासह पाच जणांचा जागीच मृत्यू

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

beed accident news truck and four wheeler pick up accident five death beed nagar road accident
beed accident news truck and four wheeler pick up accident five death beed nagar road accident
social share
google news

Beed Accident News : बीड जिल्ह्यात ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत बाप-लेकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांचा अक्षरश चक्काचूर झाला होता आणि अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वाहनांचा पत्रा देखील कापावा लागला आहे. शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास बीड-नगर मार्गावरील लिंबागणेश गावापासून काही अंतरावरील ससेवाडी शिवारात ही घटना घडली आहे. या घटनेने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (beed accident news truck and four wheeler pick up accident five death beed nagar road accident)

ADVERTISEMENT

बीड-नगर मार्गावरील ससेवाडी शिवारात शुक्रवारी रात्री ट्रक आणि पिकअपची समोरासमोर भीषण धडक बसल्याची घटना घडली आहे.या अपघातात प्रल्हाद सिताराम घरत (63), नितिन प्रल्हाद घरत (41, दोघेही रा. महाजनवाडी ता. जि. बीड) या पिता-पुत्रासह विनोद लक्ष्मण सानप (40 रा. वाघिरा ता. पाटोदा) अशा तिघांसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत अन्य दोघांची रात्री ११ पर्यंत ओळख पटली नव्हती. दरम्यान ओळख न पटलेले ट्रकमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे ही वाचा : मुंबई Tak Chavadi: नागराज मंजुळेच्या सिनेमात संभाजीराजे करणार काम, साकारणार ‘ही’ भूमिका

हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला होता. तसेच सर्व मृतांना बाहेर काढण्यासाठी एकमेकांमध्ये अडकलेल्या वाहनांचा पत्रा कापण्यासाठी यंत्र मागवावे लागले होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे वाचलं का?

शवविच्छेदनासाठी बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे काम रात्री 10 पासून सुरू होते. घटनास्थळावर एक क्रेनही आणण्यात आला होता. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून नेकनूर पोलीस व स्थानिक नागरिकांचे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतकार्य सुरू होते. या घटनेने बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचं काय होणार? राहुल नार्वेकरांनी कायदाच सांगितला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT