Bhushi Dam : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, अख्खं कुटुंब भुशी डॅममध्ये...काय घडलं?
Lonavala Bhushi Dam : भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. या दरम्यानच भुशी धरणाच्या वरच्या जंगलात असलेल्या बॅकवॉटरवर अन्सारी कुटुंब पावसाळ्याचा आनंद घेत होते.
ADVERTISEMENT
Lonavala Bhushi Dam : लोणावळा शहरातील भुशी धरणातून पाच पर्यटक वाहुन गेल्याची दुदैवी घटना घडली आहे. भुशी धरणाच्या (Bhushi Dam) मागे असलेल्या बॅकवॉटरमध्ये हे पर्यटक पावसाचा आनंद घेत होते. या दरम्यान धरण ओव्हरफ्लो झाल्याने हे पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे एकाच कुटुंबातील हे पाच व्यक्ती होते. या पर्यंटकांचा आता शोध सूरू आहे. यामधील दोघांचे मृतदेह हाती आले आहेत आणि इतर तिघांचा शोध घेतला जात आहे. (bhushi dam 5 people drowned syednagar area of pune lonavala news)
ADVERTISEMENT
भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. या दरम्यानच भुशी धरणाच्या वरच्या जंगलात असलेल्या बॅकवॉटरवर अन्सारी कुटुंब पावसाळ्याचा आनंद घेत होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पाच पर्यटक वाहुन गेल्याची घटना घडली होती. या पाच जणांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.
भुशी धरणात एक महिला आणि दोन मुलींचे मृतदेह वाहून गेले आहेत. मृत महिलेचे वय 36 वर्षे असून मुलींचे वय 13 आणि 8 वर्षे आहे. दुसरीकडे 4 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली.
हे वाचलं का?
हे ही वाचा : ''दगडफेक, गाड्या फोडल्या...हे सगळं भुजबळ घडवतोय'', जरांगेंचा गंभीर आरोप
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली होती. आत्तापर्यंत धरणाच्या पाण्यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप तीन जणांचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा : रोहित, विराटनंतर टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने घेतला संन्यास
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT