Manoj Jarange : ''दगडफेक, गाड्या फोडल्या...हे सगळं भुजबळ घडवतोय'', जरांगेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange News : 'छगन भुजबळ हे मुकादम आहेत. त्यांनी सर्वांना काम ठरवून दिले त्यानुसार काही लोक बोलत आहेत. आम्ही हाके यांना दोष देणार नाही. गाव खेड्यात आमचे बांधव आहेत, आमचे संबंध आहेत. आम्ही धनगर व ओबीसी नेत्याला विरोधक मानत नाहीत, असे देखील जरांगेंनी सांगितले.
ADVERTISEMENT
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : ''छगन भुजबळ यांनीच मातोरीमध्ये दगडफेक घडवून आणायला सांगितली. त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या. छगन भुजबळ हे मुकादम आहेत. त्यांनी सर्वांना काम ठरवून दिले आहे. त्यामुळे केवळ भुजबळ हे सर्व घडवून आणत आहेत'', असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. (manoj jarange patil criticize chhagan bhujbal on reservation maratha obc reservation)
दिवंगत विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रमात जरांगे पाटील सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले होते. ''अंबडमध्ये मुद्दाम आंदोलन सुरू केले. त्यांना वाद घडवून आणायचे आहेत. उपोषण सुद्धा वडीगोद्री मध्ये सुरू करायला लावले. छगन भुजबळ यांनी मातोरीमध्ये दगडफेक घडवून आणायला सांगितले. त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या', असा आरोप जरांगेंनी केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रोहित, विराटनंतर टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने घेतला संन्यास
तसेच 'छगन भुजबळ हे मुकादम आहेत. त्यांनी सर्वांना काम ठरवून दिले त्यानुसार काही लोक बोलत आहेत. आम्ही हाके यांना दोष देणार नाही. गाव खेड्यात आमचे बांधव आहेत, आमचे संबंध आहेत. आम्ही धनगर व ओबीसी नेत्याला विरोधक मानत नाहीत, असे देखील जरांगेंनी सांगितले.
फडणवीस यांना सांगतो माझ्या मराठ्यांना त्रास देऊ नका आमचा संयम ढलू देऊ नका. इथून पुढे माझ्या मराठा बांधवांनी त्रास होऊ नये हे काळजी फडणवीस यांनी घ्यावी, असे देखील जरांगे म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
जरांगे पुढे म्हणाले, नेत्यांची उणीव तर भासणारच आहे. त्यांनी आरक्षणासाठी काम केले. आता सरकार आरक्षणावर काम करत आहे. मला शंभूराजे देसाई यांचा फोन आला होता. परंतु आमच्या व्याख्याप्रमाणेच सगळे प्रमाणे आरक्षण मिळायला हवे अन्यथा ते मला मान्य होणार नाही.
हे ही वाचा : Beed : बबन गित्तेंनी डोक्यात घातली गोळी, परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या कशी झाली?
तसेच स्वर्गीय मेटे यांचे स्वप्न असलेले शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. केवळ महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहेत परंतु मी हे स्मारक पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जरांगेंनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT