Team India : रोहित, विराटनंतर टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने घेतला संन्यास
Team India News : टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे.टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
ADVERTISEMENT
Ravindra Jadeja Retired : टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे.टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) या दोन दिग्गज खेळाडूंनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर आता भारताच्या आणखी एका क्रिकेटरने टी20 क्रिकेटला अलविदा केले आहे. (ravindra jadeja retired from international t20 cricket india vs south africa final t20 world cup 2024)
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू सर जड्डू उर्फ रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे.
जडेजाने 10 फेब्रुवारी 2009 रोजी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या पदार्पणाचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये खेळला होता. पदार्पणाच्या टी20 सामन्यात जडेजाने 4 षटकात 29 धावा देऊन एकही विकेट घेतली नव्हती. फलंदाजीतही त्याने 7 चेंडूत 5 धावा केल्या होत्या.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Beed : बबन गित्तेंनी डोक्यात घातली गोळी, परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या कशी झाली?
जडेजाने टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलचा शेवटचा सामना खेळला होता. या सामन्यात जडेजाने तुफान फटकेबाजी करत 31 धावा ठोकल्या होत्या. तर गोलंदाजीत त्याला 12 धावा देऊन एकही बळी घेता आला नाही. म्हणजे त्याचा पदार्पण आणि शेवटचा सामना जवळपास सारखाच राहिला आहे.
रवींद्र जडेजाच्या फॉर्मबद्दल बोलायचं झालं तर 6 टी-20 विश्वचषक खेळण्याचा चांगला अनुभव असूनही, जडेजा टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणतीही जादू निर्माण करू शकला नाही. रवींद्र जडेजाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 11 डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 13 च्या सरासरीने आणि 98 च्या स्ट्राईक रेटने 102 धावा केल्या आहेत.
ADVERTISEMENT
जडेजाची सर्वात मोठी खेळी 26 धावांची होती. या 11 डावांत जडेजाने केवळ एकच षटकार मारला. या T20 विश्वचषकाच्या दोन डावात त्याच्या 7 धावा आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जडेजा पहिल्याच चेंडूवर मोहम्मद आमिरविरुद्ध बाद झाला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Rohit Sharma Virat Kohli : विराट-रोहितने एकत्र घेतला संन्यास, पण कुणाची संपत्ती जास्त?
जडेजाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर तो आपल्या गोलंदाजीची जादू दाखवू शकला नाही. त्याने 26 टी-20 विश्वचषकात 22 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध 6 विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये त्याने बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली कामगिरी केली होती, पण भारतासाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT