आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, शाहरुख खान-समीर वानखेडेंचं WhatsApp चॅट जसंच्या तसं…
Aryan Khan Drugs Case: आर्यन खानच्या अटकेदरम्यान शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात जे व्हॉट्सअॅपवर संभाषण झालं होतं ते आता समोर आलं आहे. पाहा ते चॅट जसंच्या तसं.
ADVERTISEMENT
Shah Rukh Khan-Sameer Wankhede WhatsApp chat Leaked: मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणी तुरुंगात टाकणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) वादात सापडले आहेत. पैशांसाठी आर्यन खानला जबरदस्तीने ड्रग्ज प्रकरणात गोवल्याचा आरोप समीर वानखेडेंवर असून, या प्रकरणात आर्यनला तुरुंगात जावं लागलं. दरम्यान, याच वेळी शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात व्हॉट्सअॅपवर संभाषण झाले होते. दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले होते, ते चॅट आता समोर आलं आहे. (big disclosure in aryan khan drug case shah rukh khan sameer wankhedens whatsApp chat leaked)
ADVERTISEMENT
समीर वानखेडे यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत अभिनेता शाहरुख खानसोबत झालेल्या संभाषण समोर आणलं आहे. हे मेसेज शाहरुखने पाठवले होते, असा वानखेडेंचा दावा आहे. यामध्ये आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुखने वानखेडेंना काळजी घेण्याची विनंती केली होती. वानखेडे यांना अनेकदा विनंती करून शाहरुखने म्हटले होते की,’आर्यन खानला चांगली वागणूक द्या.’
शाहरुख खानने समीर वानखेडेंना काय मेसेज केले?
एका व्हॉट्सअॅप चॅटमध्ये शाहरुखने लिहिले आहे, ‘आर्यन खानला चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करेन ज्याचा तुम्हाला आणि मला अभिमान वाटेल. ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. मी तुम्हाला याची खात्री देतो. देशाला पुढे नेणारे प्रामाणिक आणि कष्टाळू तरुण हवे आहेत. तुम्ही आणि मी आपापली जबाबदारी पार पाडली आहे, याचं अनुसरण पुढील पिढी करेल. भविष्याच्या दृष्टीने आपण त्यांच्यात बदल घडवून आणू. तुमच्या सहकार्यासाठी आणि चांगल्या वागणुकीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.’
‘देव तुमचं भलं करो. मला तुम्हाला वैयक्तिकरित्या भेटायला यावे लागेल, जेणेकरून मला तुम्हाला गळाभेट घेऊन भेटता येईल. तुम्हाला सोयीचे असेल तेव्हा कृपया मला कळवा. माझी मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद. तुमचा सदैव ऋणी राहील.’
हे वाचलं का?
हे ही वाचा >> समीर वानखेडेवर छापा पडताच शाहरुख खानचं ‘ते’ ट्विट होतंय प्रचंड व्हायरल
‘इंशा अल्लाह. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तुम्ही तुमच्या अधिकारिक क्षमतेनुसार जे जे होतील, ते प्रयत्न केले असतील. वडील म्हणूनही मी असाच विचार करतोय. परंतु कधीकधी आपले सर्वोत्तम प्रयत्न देखील पुरेसे नसतात. संयम आवश्यक आहे. धन्यवाद. खूप खूप प्रेम शाहरुख.’
‘मी तुमच्याकडे भीक मागतो, त्याला (आर्यन खान) तुरुंगात ठेवू नका. या सुट्ट्या येतील आणि तो माणूस म्हणून मोडून पडायला नको. त्याची मनस्थिती उद्ध्वस्त होईल. तुम्ही मला आश्वासन दिले होते की, तुम्ही माझ्या मुलामध्ये सुधारणा घडवून आणणार कराल आणि त्याला अशा ठिकाणी पाठवणार नाही जिथे तो पूर्णपणे तुटून जाईल आणि मनस्थिती बिघडेल. आणि त्याचा काही दोष नाही. एक चांगला माणूस म्हणून तुम्ही त्याच्याशी असं का करत आहात?, तेही त्या स्वार्थी लोकांसाठी. मी ग्वाही देतो की मी त्या लोकांकडे जाईन आणि त्यांना विनंती करेन की तुमच्यासमोर आणखी काही बोलू नका. माझ्याकडून जे जे शक्य होईल ते मी करेन जेणेकरून तुम्हाला जे करण्यास सांगितलं आहे, ते करायला लागणार नाही. मी वचन देतो की मी हे सर्व करेन आणि हे थांबवण्यासाठी अगदी भीकही मागेन. पण प्लीज माझ्या मुलाला घरी पाठवा. तुम्हालाही हे पटत असेल की त्याच्यासोबत जे झालं ते खूप झालं आहे. प्लीज प्लीज मी तुम्हाला वडील म्हणून याचना करतोय.
मी त्यांना तुम्हाला फोन करायला सांगतो. मी वचन देतो की मी स्वतः त्याचे पालन करेन. कृपया आज थोडी दया दाखवा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आज माझं मन दुखवू नका. ही एका वडिलांची एका वडिलांना विनंती आहे. तुम्ही जसं तुमच्या मुलावर प्रेम करता तसंच मी माझ्या मुलांवर करतो. बाहेरच्या लोकांना यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. समीर, मी एक नम्र आणि दयाळू व्यक्ती आहे. कृपया माझा स्वतःवरील आणि व्यवस्थेवरील विश्वास तोडू नका. कृपया हे आमचे कुटुंब मोडेल. तुम्ही मदतीसाठी प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद. मी तुमचा खूप ऋणी आहे. लव्ह शाहरुख खान
विनंती आहे की, त्याला चांगली वागणूक द्या आणि माझ्या मुलाला घरी येऊ द्या. मी तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. या संपूर्ण प्रकरणातील माझे वागणे तुम्ही पाहिले असेलच. तुम्ही जे काही केले आहे, मी त्याच्या कधीच विरोधात गेलो नाही. जेव्हा तुम्ही म्हणालात की, तुम्ही जेव्हा म्हणालात की, तुम्हाला आर्यनला एक चांगला माणूस बनवायचं आहे. यावर मी विश्वास ठेवला. तपासादरम्यान मी माझ्या मुलाला कोणतीही मदत केली नाही. ना प्रेसमध्ये गेलो, ना मीडियाशी काही बोललो, कारण माझा तुझ्या चांगुलपणावर विश्वास आहे. कृपया माझ्या मुलाशी बोलू शकाल का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> कोण आहे पूजा ददलानी? जिने आर्यन खानला वाचवण्यासाठी घेतली होती खूप मेहनत..
तुम्ही तुमच्या लोकांना घाई करू नका म्हणून सांगा. मी वचन देतो की येणाऱ्या काळात तुमच्यासाठी नेहमीच असेल आणि तुम्हाला जे काही चांगले साध्य करायचे आहे त्यात तुम्हाला मदत करेन. हे माझं तुम्हाला दिलेले वचन आहे आणि तुम्ही मला इतके ओळखता की मी ते नक्कीच पूर्ण करेन. मी तुम्हाला विनवणी करतो की माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दया करा. आपण खूप साधी माणसं आहोत आणि माझा मुलगा भलताच भरकटला असेल पण तो कठोर गुन्हेगारासारखा तुरुंगात जाण्याच्या लायकीचा नाही. ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे. जरा दयाळूपणा दाखवा, मी तुमच्यासमोर भीक मागत आहे.
प्लीज मला कॉल करा मी तुमच्याशी वडिलांप्रमाणे बोलेन. इतर कोणताही मार्गाने नाही, तर तुम्ही समजू शकता की, मी जे काही बोलत आहे, ते सगळं करेन. तुम्ही सज्जन व्यक्ती आणि चांगले पती आहात आणि मीही आहे. मला माझ्या कुटुंबाला कायद्याच्या चौकटीत राहून मदत करावी लागेल. मी तुमच्यासमोर विनवणी करतो, कृपया त्याला त्या तुरुंगात जाऊ देऊ नका. पुढे सुट्ट्या येतील आणि तो माणूस म्हणून तुटून पडेल. काही लोकांच्या चुकीच्या हेतूमुळे त्याचा आत्मविश्वास तुटेल. तुम्ही वचन दिले होते की तुम्ही माझ्या मुलामध्ये सुधारणा कराल आणि त्याला अशा ठिकाणी ठेवणार नाही जिथे तो पूर्णपणे अडकून पडेल.
ADVERTISEMENT
समीर साहेब, मी तुमच्याशी एक मिनिट बोलू शकतो का? मला माहित आहे की हे अधिकृतपणे बरोबर नसेल आणि पूर्णपणे चुकीचं असेल. पण एकदा वडिलांप्रमाणे मी तुमच्याशी बोलू शकतो का? SRK
तुम्ही मला माझ्याबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या आणि तुमचे माझ्याबद्दलचे विचारही सांगितले, त्यासाठी जितके आभार मानावेत तितके कमीच आहे. तो (आर्यन खान) एक चांगला व्यक्ती बनावा ज्याचा तुम्हाला आणि मला अभिमान वाटेल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. मी वचन देतो की ही घटना त्याच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट ठरेल. या देशाला पुढे जाण्यासाठी तुमच्यासारख्या कष्टाळू आणि तरुणांची गरज आहे.
गॉड ब्लेस यू… जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा मी स्वतः तुमची गळाभेट घेईन. हे तुम्हाला कधी सोयीचे असेल, ते मला कळवा. मी नेहमीच तुमच्या प्रामाणिकपणाचा आदर केला आहे आणि आता त्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे. तुमचा खूप आदर होईल. लव्ह एसआरके
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT