VIDEO : वन चाय प्लीज! डॉली चायवाल्याच्या टपरीवर बिल गेट्स, चहाचा लुटला आनंद

मुंबई तक

नागपूरातील डॉली चायवाल अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. त्याचे अनेक व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल झाल्यानंतर त्याची चहा देण्याच्या स्टाईलमुळे तो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळेच आताही चक्क बिल गेट्सनाही त्याच्या चहाची भुरळ पडल्यामुळेच त्यांनी वन चाय प्लिज म्हणत डॉली चहावाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

ADVERTISEMENT

Dolly Chaiwala
Dolly Chaiwala
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डॉली चायवाल्याच्या टपरीवर बिल गेट्स

Dolly Chaiwala: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत, त्या दौऱ्यामधीलच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral) झाला आहे. या व्हिडिओमध्ये बिल गेट्स चहा पिताना दिसत आहेत, आणि हीच खरी त्या व्हिडीओमधील खासियत आहे. कारण त्या सामान्य चहावाल्याने करून दिलेला चहा बिल गेट्स पिताना दिसत आहेत. बिल गेट्स यांनी नागपुरातील प्रसिद्ध 'डॉली चायवाला'सोबतचा तो व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन (Instagram) शेअरही केला आहे.

बिल गेट्सनाही पडली भुरळ

उद्योगपती बिल गेट्स यांना नेहमीच नाविन्यपूर्ण गोष्टींची भूरळ पडलेली असते. त्यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये 'One Chai, Please'म्हणत त्यांनी डॉली चायवाल्यासोबत सहजपणे संवाद सुरू केला आहे. त्या व्हिडीओमध्ये दिसणार तो डॉली चायवाला हा नागपूरचा आहे. मात्र त्याआधीपासूनच तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाला आहे.

डॉली चायवाला

नागपूरचा डॉली चायवाला हा त्याच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखला जातो. त्याच्या अनोख्या पद्धतीमुळे त्याने सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धीही मिळवली आहे. नागपुरातील जुन्या व्हीसीए स्टेडियमजवळ अगदी रस्त्याच्या कडेला तो स्टॉल चालवतो. 

चहा देण्याची वेगळी स्टाईल

डॉली चायवाला उर्फ ​​सेलिब्रिटी चायवाला म्हणूनच तो प्रसिद्ध आहे.  त्याची चहा देण्याच्या पद्धतीमुळेच तो सगळ्यांच्या खास असतो. त्याच्या त्या स्टाईलमुळेही त्याला देसी जॉनी डेप अशा नावानेही त्याला ओळखले जाते. 

टिकटॉकमुळे व्हायरल

डॉली चायवाला हा टिकटॉकमुळे प्रचंड व्हायरल झाला होता, त्यामुळेच अनेक लोकं त्याच्या त्या स्टाईलचे फॅन झाले होते. त्याची हेअर स्टाईलही आणि त्याच्या गॉगलमुळेही तो नेहमीच चर्चेत असतो.  

चर्चा रजनीकांतची

डॉली चायवाल्याची चहा देण्याच्या स्टाईलमुळेच त्याच्याकडे जाण्याची अनेकांना इच्छा असते. त्याच्या चहा देण्याच्या स्टाईलमुळे त्याची तुलना अगदी अभिनेता रजनीकांत सोबतही केली जाते. त्यामुळे डॉली चायवाल्याच्या स्टॉलवर प्रचंड गर्दी असते.

हे वाचलं का?

    follow whatsapp