Cyclone Biparjoy : धडकी भरवणारा वेग! चक्रीवादळ सध्या कुठेय? पहा Live Tracker
अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय हे चक्रीवादळ 15 जूनला गुजरातमधील कच्छला धडकणार आहे. केंद्र सरकार या वादळाच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवून आहे.
ADVERTISEMENT
biporjoy cyclone latest news : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय हे चक्रीवादळ 15 जूनला गुजरातमधील कच्छला धडकणार आहे. मात्र, त्याआधीच समुद्र प्रचंड खवळला आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातमधील 8 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकार या वादळाच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवून आहे. केंद्रीय मंत्र्यांकडे देखरेखीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (biparjoy cyclone live tracking satellite)
ADVERTISEMENT
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम आज दिसून येईल. गुजरातमधील द्वारका आणि कच्छ जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. वादळाचा प्रभाव पाहता आतापर्यंत 8 जिल्ह्यांतील 37,794 लोकांना हलवण्यात आले आहे. वादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या 15 आणि एसडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
biporjoy cyclone tracking live : बिपरजॉय चक्रीवादळ कुठे आहे?
हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ बिपरजॉय 13 जून रोजी रात्री 11:30 वाजता ईशान्य अरबी समुद्रावर देवभूमी द्वारकेच्या 300 किमी (पश्चिम-दक्षिण दिशेला) अक्षांश 21.7 (उत्तर) आणि रेखांश 66.3 (पूर्व) जवळ आहे. त्याचवेळी, ट्रॅकरच्या ताज्या अपडेटनुसार, चक्रीवादळ बिपरजॉय सध्या 165 किलोमीटर प्रतितास वेगाने गुजरात किनारपट्टीकडे सरकत आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Lok Sabha Election : भाजपचा ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे कसा गेला? इतिहास काय?
चक्रीवादळ जमिनीवर कधी आणि कुठे येणार?
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, बिपरजॉय, जे एक अतिशय तीव्र चक्रीवादळ बनले आहे, ते गुरुवारी (15 जून) दुपारी कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळ पोहोचेल. यावेळी वाऱ्याचा कमाल वेग ताशी 150 किलोमीटर असेल. जमिनीवर स्पर्श केल्यानंतर चक्रीवादळाचा वेग वेग कमी होईल, असं हवामान विभागाने म्हटले आहे.
Cyclone Warning for Saurashtra & Kutch Coasts: Orange Message. VSCS BIPARJOY at 2330 IST of 13th June over NE Arabian Sea near lat 21.7N & long 66.3E, about 300km WSW of Devbhumi Dwarka. To cross near Jakhau Port (Gujarat) by evening of 15th June as VSCS. https://t.co/KLRdEFHiFR pic.twitter.com/f7M8PIY8TZ
— India Meteorological Department (@Indiametdept) June 13, 2023
ADVERTISEMENT
लँडफॉल करण्यापूर्वी या भागांवर प्रभाव
चक्रीवादळ जमिनीवर आदळण्यापूर्वी, बिपरजॉयचा सर्वाधिक प्रभाव गुजरातमधील कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरमध्ये असेल. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरमध्ये 15 जून रोजी बहुतांश भागात विखुरले जाण्याची शक्यता आहे, तर जवळपासच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 जूनच्या सकाळसाठी, हवामान विभागाने वाऱ्याचा वेग 120-130 किमी प्रतितास ते 145 किमी वेगाने असेल, अशा इशारा दिला आहे. बुधवार संध्याकाळपर्यंत समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
Video >> मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आगीच्या लोळांनी बघता बघता चौघांना संपवलं, नेमकं काय घडलं?
मुंबईत दोन पथके तैनात
गुजरातशिवाय मुंबईतही चक्रीवादळाची तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) खबरदारीचा उपाय म्हणून शहरात दोन अतिरिक्त पथके तैनात केली आहेत. पश्चिम आणि पूर्व उपनगरातील अंधेरी आणि कांजूरमार्ग भागात एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT