Budget 2024 : बजेटमधून वैद्यकीय क्षेत्राला नेमकं काय मिळालं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

budget 2024 nirmala sitaraman pm narendra modi ayushaman bharat yojna schme what announcement for medical sector
budget 2024 nirmala sitaraman pm narendra modi ayushaman bharat yojna schme what announcement for medical sector
social share
google news

Budget 2024 parliament session, Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकारने (Pm Narendra Modi) हा अर्थसंकल्प सादर करताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. त्यामुळे हा बजेट मोदी सरकारला किती फायद्याचा ठरतो. हे आगामी निवडणूकीच्या निकालात कळणार आहे. मात्र तत्पूर्वी वैद्यकीय क्षेत्रासाठी बजेटमध्ये (Budget 2024) काय घोषणा करण्यात आल्या आहेत. याचा सर्वसामान्यांना काय फायदा होणार आहे? हे जाणून घेऊयात. (budget 2024 nirmala sitaraman pm narendra modi ayushaman bharat yojna schme what announcement for medical sector )

निर्मला सितारमण यांनी बजेट मांडताना आयुष्मान भारत योजनेबाबत मोठी केली आहे. आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती आणखीण वाढवली जाणार असल्याचे सितारमण यांनी म्हटले आहे. आतापर्यंत सर्वसामन्य लोकांना या योजनेला लाभ मिळत होता.मात्र आता आशा आणि अंगणवाडी सेविकांना देखील याचा लाभ मिळणार आहे,अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरीकांना स्वस्तात उपचाराचा लाभ मिळणार आणि आर्थिक ताण सहन करावा लागणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : NCP : शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत, अध्यक्ष कसे?; अजित पवार गटाची अखेरची खेळी

या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत मिळत होता. मोदी सरकारने या रक्कमेत कोणताही बदल केला नाही. फक्त या योजनेचे लाभार्थी वाढणार आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरीकांनंतर आता आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना देखील याचा लाभ मिळणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकी योजना काय?

केंद्र सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना सूरू केली होती. या योजनेअंतर्गत, सरकार पात्र कुटुंबियांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करते.या योजनेतील पात्र कुटुंबांना आयुष्मान गोल्डन कार्ड दिले जाते. हे कार्ड दाखवून पात्र व्यक्तीला सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतात.

हे ही वाचा : Prashant Kishor : भाजप 400 जागा जिंकू शकतं का? प्रशांत किशोरांची मोठी भविष्यवाणी

आयुष्मान गोल्डन कार्ड देशभरातील 13,000 हून अधिक सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये वैध आहे. या आयुष्मान गोल्डन कार्डच्या माध्यमातून कॅन्सर आणि हृदयरोग संबंधित गंभीर आजारांसह 1500 गंभीर आजारावर उपचार मिळतो. या योजनेत जूनी आणि नव्या सर्व आजारांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT