बंटी पाटील की मुन्ना महाडिक… कोल्हापूरचा किंग कोण?, ‘ही’ निवडणूक ठरवणार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

bunty patil or munna mahadik who is the king of kolhapur rajaram sugar factory election will decide
bunty patil or munna mahadik who is the king of kolhapur rajaram sugar factory election will decide
social share
google news

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur) म्हटलं की तांबडा-पांढरा रस्सा आपल्या नजरेसमोर येतो. अगदी तसंच कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की महाराष्ट्रासमोर बंटी पाटील (Bunty Patil) आणि महाडिक (Munna Mahadik) कुटुंबातला संघर्ष समोर येतो. कोल्हापूरच्या राजकारण सहकाराभोवती फिरतं. आणि याच सहकारामुळे या संघर्षाला नवी धार चढली आहे. महाडिक कुटुंबाच्या हातातलं शेवटचं सत्ताकेंद्र मिळवण्यासाठी बंटी पाटलांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत पण त्याआधीच त्यांना दोन झटके बसले. तर आपली 25 वर्षांची सत्ता अबाधित राखण्यासाठी महाडिकांची तिसरी पिढी आखाड्यात उतरली आहे. अवघे तेरा हजार मतदार असलेली राजाराम कारखान्याची निवडणूक कोल्हापूरच्या राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. असं का म्हटलं जातंय आणि या निवडणुकीत कोणकोणते फॅक्टर महत्त्वाचे आहेत. हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (bunty patil or munna mahadik who is the king of kolhapur rajaram sugar factory election will decide)

कोल्हापुरात पुन्हा एकदा निवडणुकीचं धुमशान सुरू झालं आहे. यावेळी निमित्त आहे, राजाराम सहकारी साखर कारखान्याचं. गोकूळ, राजाराम ही कोल्हापूरच्या राजकारणातली कळीची सत्ताकेंद्रं आहेत. इथे ज्यांची सत्ता, त्यांच्या कलेनं जिल्ह्याचं राजकारण चालतं, असा रिवाज तयार झाला आहे. कधीकाळी ही सत्ताकेंद्र महाडिक कुटुंबाच्या ताब्यात होतं. संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणातही महाडिकांचा शब्द चालायचा. कुटुंब एक असलं तरी यांचं राजकारण तीन पक्षांत चालायचं. थोरले महाडिक महादेवराव काँग्रेसमध्ये त्यांची दुसरी पिढी धनंजय महाडिक राष्ट्रवादीत, तर अमल महाडिक भाजपमध्ये.

दोन कुटुंबातला संघर्ष

पण 2015 ला महाडिकांच्या या अवाढव्या साम्राज्याला पहिला हादरा बसला. सलग 18 वर्षांची विधान परिषदेतली काँग्रेसकडून मिळालेली आमदारकी गेली. पाटलांनी मातब्बर महादेवरावांचा मानहानीकारक पराभव केला. याआधी 2014 च्या विधानसभेमध्ये भाजपच्या अमल महाडिकांनी काँग्रेसच्या बंटी पाटलांना चीतपट केलं. इथूनच दोन कुटुंबातला संघर्ष सुरू झाला. अमल महाडिक हे महादेवरावांचे सुपुत्र आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत तर राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा आमचं ठरलंय, असं सांगून पराभव करण्यात आला. यापाठोपाठ सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी पहिल्याच निवडणुकीत अमल महाडिकांना पराभूत केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अधिक वाचा- ‘माझ्यावर 14 केसेस केल्या, मी का क्रिमिनल आहे का? आता महाभारत होणार! महाडिकांचा इशारा

‘आमचं ठरलंय…’

कधीकाळी सगळी सत्ता उपभोगणारं महाडिक कुटुंब अचानक सत्तापदांपासून दूर गेलं. यानंतर बंटी पाटलांनी हसन मुश्रीफांना सोबत घेत आमचं ठरलंय, गोकूळ उरलंय असं म्हणत या निवडणुकीत महाडिकांच्या सत्तेला खुलं आव्हान दिलं आणि याचाच परिणाम म्हणून जिल्ह्याच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं केंद्र असलेल्या गोकूळ दूध संघातली महाडिकांची सद्दी संपली.

एकप्रकारे गोकूळमधून महाडिक युगाचाच अंत झाला. 2019 पासून महाडिक कुटुंबाला वेगवेगळ्या सलग 9 निवडणुकीत पराभवाचं तोंड बघावं लागलं. जून 2022 मध्ये झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात धनंजय महाडिक सहाव्या जागेवर भाजपकडून विजयी झाले. या विजयानं महाडिक कुटुंबाला मोठं मानसिक बळ मिळालं.

ADVERTISEMENT

अधिक वाचा- विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर, फडणवीसांनी MVA ला पुन्हा चारली धूळ!

हेच उंचावलेलं मनोबल घेऊन महाडिकांनी तिसऱ्या पिढीला राजकारणात सक्रीय केलं. विश्वराज धनंजय महाडिकही राजकारणात उतरले. तर कोल्हापूरच्या राजकारणात सलग नऊवेळा महाडिकांच्या पराभव करणाऱ्या बंटी पाटलांनीही राजारामसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. आठ वर्षांपूर्वी राजारामच्या निवडणुकीत बंटी पाटलांचा थोडक्यात पराभव झाला. तेव्हापासूनच बंटी पाटलांनी महाडिक कुटुंबाकडे असलेलं एकमेव सत्ताकेंद्र ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे.

ADVERTISEMENT

13 हजार मतदार ठरवणार भवितव्य..

कोल्हापूर हा बारा तालुके, दोन लोकसभा मतदारसंघ असलेला जिल्हा आहे. या तुलनेत राजाराम सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले या तालुक्यांतल्या केवळ 122 गावांत विस्तारलेलं आहे. आणि या कारखान्याचं भवितव्य ठरवणार आहेत 13 हजार 538 मतदार.

अधिक वाचा- 26 वर्षांचा विश्वराज हाकणार ‘भीमा’चा कारभार : अमेरिकेतून थेट कारखान्याच्या राजकारणात

तुम्ही म्हणाल, 13 हजार मतदार हे 38 लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याचं राजकारण कसं ठरवू शकतात. तर पाटील-महाडिक घराण्यातला जो इतिहास तुम्ही बघितला, त्यावरून तुम्हाला ही निवडणूक कोणासाठी, कशी महत्त्वाची आहे, याचा अंदाज येईल. कारखान्याच्या 21 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान आहे.

बंटी पाटलांना दोन झटके

यावेळी राजारामच्या प्रचाराची सूत्रं माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे आहेत. यानिमित्तानं पुन्हा एकदा बंटी पाटील विरुद्ध अमल महाडिक असा सामना बघायला मिळणार आहे. पण त्याआधीच बंटी पाटलांना दोन झटके बसले आहे.

अधिक वाचा- धनंजय महाडिक कोण आहेत?, भाजपने त्यांनाच उमेदवारी का दिलीये?

कारखान्याचं कार्यक्षेत्र 122 गावांमध्ये आहे. कार्यक्षेत्राबाहेरील गावातले सभासद अपात्र ठरवण्यासाठी पाटलांनी न्यायालयीन लढा दिला. पण त्यांना अपयश आलं. बंटी पाटलांना हा पहिला झटका बसला. दुसरीकडे अर्ज छाननीत पाटील गटाचे 29 अर्ज अवैध ठरले. हा दुसरा झटका असल्याचं म्हटलं गेलं. आता याविरोधातही पाटील गट कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. पण सध्याच्या घडीला राज्यातली सत्ता, बंटी पाटलांना मतदानाआधीच बसलेले दोन झटके बघता महाडिकांची सरशी झाली आहे.

ही निवडणूक महाडिक कुटुंबासाठी अस्तित्वाची लढाई आहे. कारण सलग 30 वर्षांपासून राजाराम कारखाना महाडिकांच्या ताब्यात आहे. इथली सत्ता गेली, तर महाडिकांच्या राजकारणाला मोठा ब्रेक बसेल. दुसरीकडे सतेज पाटलांनी राजाराममध्येही सत्ता मिळवली, तर तेच जिल्ह्याचं सर्वमान्य, सर्वसमावेश नेतृत्व म्हणून समोर येतील. याउलट महाडिक कुटुंब जिंकल्यास जिल्ह्याचं राजकारण नव्या दिशेनं वाहायला सुरवात होईल, असं म्हटलं जातं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT