Chandrayaan-3: चंद्रयान 3 च्या लँडरने पाठवले चंद्र आणि पृथ्वीचे नवीन फोटो…
चंद्रयान 3 ने त्याच्या लँडर कॅमेरात टिपलेले चंद्र आणि पृथ्वीचे फोटो पाठवले आहेत. या फोटोत निळ्या पृथ्वीवर सफेद रंगाच्या ढगांची चादर दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत चंद्राचा पृष्ठभाग कॅमेरात कैद झाला आहे. हे दोनही फोटो चंद्रयान 3 च्या लँडर कॅमेराने टिपले आहेत.
ADVERTISEMENT

चंद्रयान 3 (chandrayaan 3) ने नुकताच चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर चंद्रयान 3 ने फोटो पाठवू का? असा आशयाचे ट्विट केले होते. या ट्विटनंतर आता चंद्रयान 3 ने त्याच्या लँडर कॅमेरात टिपलेले चंद्र आणि पृथ्वीचे फोटो पाठवले आहेत. या फोटोत निळ्या पृथ्वीवर सफेद रंगाच्या ढगांची चादर दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत चंद्राचा पृष्ठभाग कॅमेरात कैद झाला आहे. हे दोनही फोटो चंद्रयान 3 च्या लँडरमध्ये बसवलेल्या कॅमेराने टिपले आहेत. (chandrayaan 3 camera took new image of earth and moon know about it)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने 14 जुलैला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून चंद्रयान 3 चे उड्डाण केले होते. या उड्डाणानंतर 5 ऑगस्टला चंद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. यानंतर चंद्रयानच्या लँडरमध्ये लावण्यात आलेल्या (Lander Imager- LI) लँडर इमेजर कॅमेरेद्वारे पृथ्वीचा फोटो काढला आहे. या फोटोत निळ्या पृथ्वीवर सफेद ढगांची चादर दिसते आहे. याआधी 5 ऑगस्टला चंद्रयानमध्ये लावण्यात आलेल्या दुसऱ्या कॅमेराने चंद्राचा फोटो पाठवला होता.चंद्रयानवर लावण्यात आलेल्या लँडर
होरिझोंटल वेलोसिटी कॅमेरेद्वारे (Lander Horizontal Velocity Camera-LHVC)चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवले होते.

हे ही वाचा : PM Modi Speech Manipur: अखेर पंतप्रधान मोदी मणिपूर हिंसाचारावर बोलले, पण…
चंद्रयानमध्ये लावण्यात आलेला LI कॅमेरा गुजरामध्ये असलेल्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC) बनवला आहे. LHVC हा कॅमेरा बंगळूरूच्या लॅबोरेट्री फॉर इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम (LEOS)ने बनवला आहे.LHVC हा लँडरच्या खालच्या बाजूस लावण्यात आला आहे. तो चंद्राच्या पृष्ठभागावरचे फोटो घेतो.
