Chandrayaan3 चंद्राच्या उंबरठ्यावर! विक्रम लँडर-प्रोपल्शन मॉड्यूल कसं करणार काम?
चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचले आहे. आता साऱ्या जगाच्या नजरा त्याच्या लँडिंगवर आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान-३ या चंद्र मोहिमेने चंद्राभोवती जवळपास गोलाकार प्रदक्षिणा केली आहे. चांद्रयान-3 चा विक्रम लँडर आज यानाच्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे होणार आहे.

16 ऑगस्ट रोजी सकाळी चांद्रयान-3 ने चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केला. आता तुम्ही विचार करत असाल की जेव्हा प्रोपल्शन मॉड्यूल आणि विक्रम लँडरपासून वेगळे होतील, तेव्हा लँडर पुढचा प्रवास कसा करेल? चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Lok Sabha Election : मोदीच येणार, पण…; नव्या सर्व्हेने भाजपचं वाढलं टेन्शन!
काय आहे संपूर्ण प्रक्रिया?
आज म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता चांद्रयान-3 चे इंटिग्रेटेड मॉड्यूल दोन भागात विभागले जाईल. त्याचा एक भाग म्हणजे प्रोपल्शन मॉड्यूल आणि दुसरा भाग म्हणजे लँडर मॉड्यूल. उद्या (18 ऑगस्ट), प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे झाल्यानंतर, प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्युल 100 किमी x 100 किमी कक्षेत फिरू लागतील. मात्र, दोघांमध्ये काही अंतर असेल जेणेकरून ते एकमेकांना भिडणार नाहीत. त्यानंतर 18 आणि 20 ऑगस्ट रोजी लँडरचे डीऑर्बिटिंग केले जाईल.
पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशन्सचा अभ्यास करण्यासाठी प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत 3 ते 6 महिने राहील तर लँडर-रोव्हर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. येथे ते 14 दिवस पाण्याचा शोध घेतील यासह अन्य प्रयोग करणार आहेत.
प्रोपल्शनपासून विभक्त झाल्यानंतर, लँडर डीबूस्ट केले जाईल. म्हणजे त्याचा वेग कमी होईल. येथून चंद्राचे किमान अंतर 30 किमी असेल. 23 ऑगस्ट रोजी सर्वात कमी अंतरावरून चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल. लँडर ३० किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेपर्यंत ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असेल.
Sana Khan Bjp : भाऊ म्हणाला ‘ही सना खान नाही’, मग ‘तो’ मृतदेह कुणाचा?
यादरम्यान प्रदक्षिणा करत असताना त्याला चंद्राच्या दिशेने 90 अंशाच्या कोनात फिरणं सुरू करावं लागेल. लँडिंग प्रक्रियेच्या सुरुवातीला, चांद्रयान-3 चा वेग सुमारे 1.68 किमी प्रति सेकंद असेल. लँडरच्या डीबूस्टरच्या मदतीने ते खाली करून, पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरण्याचा प्रयत्न केला जाईल.
चांद्रयान 3 चे आतापर्यंत चार टप्पे यशस्वी!
चांद्रयान 3 पहिल्यांदा चंद्राच्या कक्षेत दाखल झाले तेव्हा त्याची कक्षा 164 किमी बाय 18,074 किमी होती. कक्षेत प्रवेश करताना त्याच्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यांनी चंद्राचे फोटोही टिपले. इस्रोने त्याचा व्हिडीओ बनवून आपल्या वेबसाईटवर शेअर केला. या फोटोंमध्ये चंद्राचे खड्डे स्पष्टपणे दिसत आहेत. आतापर्यंत चांद्रयान-3 शी संबंधित चार टप्पे पूर्ण झाले आहेत. पाचवा टप्पा म्हणजे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल विभक्त होणे. त्यानंतर 23 तारखेला साडेसहा वाजता लँडिंग केले जाईल. हा आठवा टप्पा असेल.
Nawab Malik : शरद पवार-अजित पवारांनी लावली ताकद; मलिकांसाठी इतकी चढाओढ का?
लँडिंगच्या वेळी भरपूर धूळ उडण्याची शक्यता आहे म्हणूनच धूळ स्थिर होईपर्यंत रोव्हर लँडरमधून बाहेर पडणार नाही. यानंतर नवव्या टप्प्यात रोव्हर लँडरमधून बाहेर येईल. बाहेर पडल्यानंतर, रोव्हर प्रज्ञान लँडरच्या आजूबाजूच्या क्षेत्राची सतत तपासणी करेल. तपासणी केल्यानंतर, तो सतत त्याचा डेटा विक्रम लँडरला पाठवेल. लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवर फिरणाऱ्या प्रोपल्शन मॉड्यूलला त्याची माहिती देईल. येथून डेटा बंगळुरू येथे स्थित इंडियन डीप स्पेस नेटवर्कला (IDSN) मिळेल.