Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेत दुसरं मोठं यश,चंद्रावर आता आणखी काय सापडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chandrayaan 3 mission pragyan rover first observation detail share to isro
chandrayaan 3 mission pragyan rover first observation detail share to isro
social share
google news

इस्रोच्या हाती आता चांद्रयान मोहिमेत दुसरं मोठं यश लागले आहे. प्रज्ञान रोव्हरला आता चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियमची उपस्थिती आढळून आली आहे. यासोबत दक्षिण ध्रुवावर सल्फर (एस) च्या उपस्थितीची स्पष्टपणे पुष्टी होतेय. तर हायड्रोजनचा शोध सुरू आहे. प्रज्ञान रोव्हरवर लावण्यात आलेल्या लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS)ने ही माहिती चंद्राच्या पृष्ठभागावरून गोळा केली आहे. (chandrayaan 3 mission pragyan rover first observation detail share to isro)

ADVERTISEMENT

चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावरील सॉफ्ट लँडिंगनंतर दुसरे निरीक्षण पाठवले आहे. या निरीक्षणानूसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरचे अस्तित्व आढळून आले आहे. याशिवाय चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियमची उपस्थिती आढळून आली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : NCP: राष्ट्रवादी कुणाची? निकालाआधीच निवडणूक आयोगावर संशय, कुणी केला व्यक्त?

इस्रोने दिलेल्या माहितीनूसार, चंद्राच्या पृष्ठभागावर मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन देखील आहेत. तसेच दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (एस) च्या उपस्थितीची स्पष्टपणे पुष्टी करते प्रज्ञान रोव्हरवर लावण्यात आलेल्या लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS)ने ही माहिती दक्षिण ध्रुवावरुन मिळवली आहे. LIBS इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS)NCP: राष्ट्रवादी कुणाची? निकालाआधीच निवडणूक आयोगावर संशय, कुणी केला व्यक्त?/ISRO, बेंगळुरूच्या प्रयोगशाळेत विकसित केले आहे.

दरम्यान यापुर्वी चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरवर चढलेल्या ChaSTE पेलोडने चंद्राच्या तापमानाचे पहिले निरीक्षण पाठवले होते. ChaSTE च्या मते, चंद्राच्या पृष्ठभागावर आणि वेगवेगळ्या खोलीच्या तापमानात खूप फरक आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावरील तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअस आहे. त्याच वेळी, 80 मिमी खोलीवर उणे 10 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. ChaSTE मध्ये 10 तापमान सेन्सर आहेत, जे 10 सेमी म्हणजेच 100 मिमी खोलीपर्यंत पोहोचू शकतात. ChaSTE पेलोड हे स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी, VSSC ने फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, अहमदाबाद यांच्या सहकार्याने विकसित केले आहे.

हे ही वाचा : ISRO: सूर्याच्या उष्णतेने Aditya-L1 भस्म होणार नाही?, ISRO च्या तज्ज्ञांची भन्नाट शक्कल!

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT