Chandrayaan-3: अन् मोदींना अश्रू अनावर; ISRO च्या शास्त्रज्ञांना म्हणाले, ‘तुमच्यामुळे…’
Chandrayaan-3 Mission PM Modi in ISRO: चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्त्रोमधील शास्त्रज्ञांचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे आज (26 ऑगस्ट) स्वत: बंगळुरुती इस्त्रो नियंत्रण कक्षात गेले होते. जिथे भाषणादरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले.
ADVERTISEMENT

Chandrayaan-3 Mission PM Modi Isro: बंगळुरु: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे आज (26 ऑगस्ट) सकाळीच बंगळुरू येथील इस्रो (ISRO) नियंत्रण कक्षाच्या मीटिंग हॉलमध्ये पोहोचले. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या विक्रम लँडरचं (Vikram Lander) चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करुन भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. ज्यामुळे पंतप्रधान मोदींनी स्वत: बंगळुरूत येऊन इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं प्रचंड कौतुक केलं. मात्र, यावेळी आपल्या भाषणादरम्यान, मोदींचे डोळे भरून आले.. शास्त्राज्ञांचं कौतुक करताना त्यांना अक्षरश: गहिवरून आलं. (chandrayaan 3 pm modi breaks down in tears during his speech at isro pm reach bangalore from greece visit to meet scientist team)
पाहा ISRO नियंत्रण कक्षात पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले…
‘माणसाच्या आयुष्यात अनेक वेळा अशा घटना घडतात, ज्यामध्ये अधीरता वरचढ होते. यावेळी माझ्याबाबतीतही तसेच झाले. इथे येण्याची मी केव्हापासून वाट पाहत होतो. मी दक्षिण आफ्रिकेत होतो, नंतर ग्रीसला गेलो. पण माझे मन सदैव तुमच्यासोबत इथेच होते. कधी-कधी वाटतं की मी तुमच्यावर अन्याय करतोय. माझी अधीरता यामुळे तुम्हाला त्रास झाला. तुम्हा सगळ्यांना सकाळी लवकर यावं लागलं. पण मला सारखं वाटत होतं की, तुम्हाला भेटावं तुमचे आभार मानावे अन् नमस्कार करावा.. म्हणून मी आज इथे आलो आहे.’ असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
हे ही वाचा >> ISRO Chandrayaan 3 Pragyan Rover : प्रज्ञानचा ‘मूनवॉक’! चंद्रावर पहिला व्हिडीओ
…अन् पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर!
‘भारतात येताच मला लवकरात लवकर तुमचं दर्शन घ्यायचं होतं. तुम्हा सर्वांना सलाम करावासा वाटला. तुमच्या मेहनतीला सलाम… सलाम तुमच्या जिद्दीला…’ या वाक्यानंतरच पंतप्रधान मोदींचे डोळेही पाण्याने भरून आले आणि त्यांना प्रचंड गहिवरून आलं. आपले अश्रू काहीसे रोखत ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही देशाला ज्या उंचीवर नेले आहे ती काही सामान्य गोष्ट नाही. जिथे कोणीच पोहोचलं नाही तिथे आपण पोहोचलो आहोत. जे आजवर कोणी केलं नव्हतं ते आपण केलं. हा आजचा भारत आहे. निर्भय आणि लढणारा भारत. नवा विचार करणारा हा भारत आहे.’
’21व्या शतकातील जगातील सर्वात मोठ्या समस्या आपण सोडवू. 23 ऑगस्टचा तो दिवस… तो प्रत्येक सेकंद पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येतोय.. लँडर चंद्रावर उतरताच केली. इस्रोच्या केंद्रापासून देशभरात लोकांनी जो जल्लोष केला ते दृश्य कोण विसरू शकेल. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण अजरामर झाला. तो क्षण या शतकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.’ असं पंतप्रधान मोदी म्हणाले..