‘तुम्ही 50 ठिकाणी माफी मागणार आहात का?’, छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
मी चूक केली आणि त्याबद्दल माफी मागण्यासाठी आलो, असं म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन घेरलं. पवारांच्या या विधानानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत उलट सवाल केला.
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal vs sharad Pawar : छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात शरद पवारांनी सभा घेतली. मी चूक केली आणि त्याबद्दल माफी मागण्यासाठी आलो, असं म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन घेरलं. पवारांच्या या विधानानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत उलट सवाल केला. येवला मतदारसंघाची निवड मी केली होती, शरद पवारांनी नाही, असा दावा छगन भुजबळांनी केला.
ADVERTISEMENT
शरद पवारांनी घेतल्या सभेला छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. ते म्हणाले, “शरद पवार हे नाशिक आणि माझा मतदारसंघ येवल्यामध्ये आले होते. त्यांनी भाषण केले. कालच्या सभेचे नियोजन ज्या माणिकराव शिंदे यांनी केले, त्यांना 2 जानेवारी 2020 मध्ये पक्षाच्या बाहेर काढलेले आहे. ज्यांना काढलं त्यांचं पक्षासाठी योगदान तर नाही, पण येवल्यासाठीही नाही. दुसरे कुणी भेटले नाही, म्हणून त्यांचे सहकार्य घेतले.”
“जे लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतात, त्या दराडे बंधुनीही ताकद लावली होती. काल ती सगळी मंडळी स्टेजवर होती. विशेषतः दोन-तीन ज्येष्ठ मंडळी होती. त्यांच्या घरातील तरुण कार्यकर्ते माझ्या स्वागताला आलेले होते. तिथे अनेक जण असे होते जे पक्षाला त्रास देतात”, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
मी राष्ट्रवादी आल्यानंतर नेता झालो नाही
“2004 मध्ये शरद पवारांनी सांगितले की, तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल. त्याच्या अगोदर मी मुंबईतील माजगाव मतदारसंघातून निवडून आलेलो होतो, शिवसेनेच्या तिकिटावर. मी 1985 मध्ये शिवसेनेचा आमदार आणि नेता झालो. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर नेता झालो असं नाही. शिवसेनेतील नेत्यांमध्ये मला मोठं स्थान होतं”, असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर पलटवार केला.
वाचा >> ‘अजित पवारांना आरएसएस, नितीन गडकरी गटाचा विरोध’, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली सगळी स्टोरी
पुढे भुजबळ म्हणाले, “2003 मध्ये तेलगी घोटाळा झाला. त्याला मीच पकडलं कारण मी गृहमंत्री होतो. त्याला मोक्का मीच लावला. पण, नेहमीप्रमाणे मीच काहीतरी केल्याचं बालंट माझ्यावर आलं. त्यानंतर साहेबांनी (शरद पवार) सांगितलं की, राजीनामा द्या. मी राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे दिली. सीबीआयने मला दिल्लीला बोलावलं. समीरलाही बोलावलं. चौकशी पूर्ण झाली.”
कारण नसताना राजीनामा घेतला
“त्यावेळी भाजपचे सरकार होते. सीबीआयने जे आरोपपत्र दाखल केले, त्यात भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं. याचा अर्थ कारण नसताना माझा राजीनामा झाला. नंतर मला निवडणूक लढवायला सांगितलं. एंरडोल, धरणगाव, वैजापूर, मुंबईचे लोकही म्हणत परत उभे रहा म्हणत होते. जुन्नरचेही तेच म्हणत होते. येवला-लासलगावमधूही उभे रहा, असं लोक म्हणत होते”, असं भुजबळ यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
वाचा >> Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण? सर्व्हे काय सांगतोय?
“त्यावेळी शरद पवारांनी मला सांगितलं की धोका पत्करायला नको. जुन्नर माझ्या वडिलांचे गाव. पुणे जिल्ह्यात असल्यामुळे साहेबांचं (शरद पवार) लक्ष होतं. ते म्हणाले, जुन्नरमध्ये असाल, तर दगाफटका होणार नाही. त्यात महिना गेला. लासलगाव येवलाचे नेते रामटेक बंगल्यावर यायचे. ते म्हणत होते की त्यांच्या मतदारसंघातून लढा. त्यांचा माझा संबंध नव्हता. शिवसेनेच्या शाखेच्या उद्घाटनाला गेलेलो. राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवाराच्या प्रचाराला गेलो होतो”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
“मी त्यांना विचारलं की, कशासाठी आग्रह आहे. त्यांचं म्हणणे होते की तालुका दुष्काळी आहे. विकासापासून पिछाडीवर आहे. त्यासाठी तुम्ही हवे आहात. मी शरद पवारांना मी सांगितलं की, येवल्यात मला काम करण्याची संधी आहे. त्यांनी मला येवल्याला पाठवलं, हे बरोबर नाही. मी येवल्याची निवड केली. येवल्याच्या लोकांच्या सांगण्यावरून. तो मतदारसंघ सुरक्षित नव्हता. परंतु संघर्ष केला आणि लोकांनी निवडून दिले. चार वेळा निवडून दिले”, असं सांगत छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या भाषणाचा समाचार घेतला.
“एखाद्याला एकदा तिकीट दिल्यावर तो निवडून येईल. परत परत जेव्हा निवडून येतो, तेव्हा काहीतरी जनतेचे प्रेम असल्याशिवाय… तेही 80 हजार, लाख मताधिक्य घेऊन. अलीकडे तर मी एक दिवसच प्रचारासाठी जातो. बाकी महाराष्ट्रातच फिरत असतो. पण, तरी त्यांनी माफी मागितली की, मी चुकलो. म्हणजे काय वीस वर्षापूर्वी चुकीचा उमेदवार दिला.”
वाचा >> NCP चे अध्यक्ष शरद पवार की, अजित पवार? पक्षाची घटना, नियम काय सांगतात?
“त्यांनी सांगितले की माफी मागतो. मला हेच कळले नाही की ते का आले? कदाचित त्यांना वाटलं असेल हा ओबीसींचा नेता आहे. त्याच्यामुळे याच्याकडे आधी गेले पाहिजे. महाराष्ट्र, देशात भाषणे करतो. ते महत्त्वही त्यांना वाटलं असेल”, असं म्हणत भुजबळांनी पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला.
शरद पवारांवर प्रश्नांची सरबत्ती, छगन भुजबळ म्हणाले…
“माझं म्हणणे असे आहे की तुम्ही माफी मागता. तुम्ही कशाला माफी मागता? किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार आहात, 50 ठिकाणी? गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत तुम्ही माफीच मागत जाणार आहात का? पुण्यापासून बीडपर्यंत आणि खाली लातूरपर्यंत माफी मागणार का? कशासाठी माफी मागणार?”
वाचा >> 30 जून! अजित पवारांच्या ‘या’ बैठकीतच झाला शरद पवारांना धक्का देण्याचा प्लॅन
“दिलीप वळसे-पाटलांसारखा… त्यांचे वडील त्यांच्यासोबत होते. दिलीप वळसे-पाटील हेही त्यांच्यासोबत पीए म्हणून काम करायचे. त्या आंबेगावला मीटिंग ठरलेली असताना तुम्ही घेतली नाही. बाकीच्या सगळ्या मीटिंग रद्द केल्या, फक्त येवला मला पाहिजे म्हणाले. मला यायचंय. काय केलंय मी? कशासाठी?”
हे झाले कुठून? साहेब तुमच्या घरातून झाले ना? 61-62 वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं, त्या अजित पवारांमुळे… ते तर मुख्य. ते उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत. ही मंडळी का गेली, याचा विचार करा ना? दिल्लीत अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत असलेले प्रफुल पटेल का जातात? सोनिया गांधींपासून नरेंद्र मोदींसोबत चर्चा करण्यासाठी पवार साहेब पटेलांनाच पाठवायचे. तेही गेले. का गेले याचा विचार केला पाहिजे”, असं प्रत्युत्तर भुजबळ यांनी शरद पवारांना दिलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT