Shortage Of Condom : देशात कंडोमचा तुटवडा, कुटुंब नियोजन कार्यक्रमाच काय होणार?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

condom shortage in india media report union ministry of health tells the truth
condom shortage in india media report union ministry of health tells the truth
social share
google news

Shortage Of Condom : देशात येत्या काळात कंडोमचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय खरेदी एजन्सी, सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी (CMSS) वेळेवर गर्भनिरोधक पुरवण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे देशात कंडोमचा तुटवडा पडणार आहे, आणि याचा थेट परिणाम कुटूंब नियोजन कार्यक्रमावर होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कंडोम तुटवड्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे. हे जाणून घेऊयात. (condom shortage in india media report
union ministry of health tells the truth)

ADVERTISEMENT

कंडोम ब्रँड ‘निरोध’ बनवणारी कंपनी ऑल इंडिया कंडोम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने सरकारला पत्र लिहून याबाबतची माहिती दिली होती. नवी दिल्ली स्थित असलेल्या CMSS ही स्वायत्त संस्था केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. केंद्रीय खरेदी एजन्सी राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी कंडोम खरेदी करते. हीच CMSS संस्था वेळेवर गर्भनिरोधक पुरवण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे देशात कंडोमचा तुटवडा पडणार असल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा : Rajasthan CM : राजस्थानात वसुंधरा ‘राज’ नाहीच! भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री

कुटुंब नियोजनाच्या गरजा पुर्ण होणार

CMSS ने मे 2023 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी 5.88 कोटी कंडोम खरेदी केले आहेत. सरकारकडे सध्या उपलब्ध असलेल्या कंडोमची संख्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी असल्याचे सांगितले आहे. तसेच सध्या, NACO (नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन) M/S HLL Lifecare लिमिटेड कंपनीकडून 75% मोफत कंडोम पुरवठा होत आहे आणि CMSS 2023-24 साठी उर्वरित 25% कंडोम नुकत्याच मिळालेल्या मंजुरीच्या आधारे पुरवणार आहे.

हे वाचलं का?

M/S HLL Lifecare Limited ने NACO साठी 6.6 कोटी कंडोम दान केले आहेत. कंडोमची ही संख्या सध्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. तसेच, CMSS च्या खरेदीला विलंब झाल्यामुळे कंडोमचा तुटवडा जाणवणार नाही.CMSS ने चालू आर्थिक वर्षात कंडोम खरेदीसाठी आधीच निविदा जारी केल्या आहेत आणि निविदांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

हे ही वाचा : Shivraj Singh यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडल्या महिला, नेमकं काय घडलं?

आरोग्य मंत्रालय काय म्हणाले?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हे वृत्त चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.तसेच सरकारच्या गर्भनिरोधकांचा सध्याचा साठा राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

ADVERTISEMENT

आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया आणि औषधे आणि वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयाची साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT