Balu Dhanorkar : काँग्रेसवर आघात! चंद्रपूरचे खासदार धानोकर यांचं दिल्लीत निधन
काँग्रेस पक्षाचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीत निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी बाळू धानोकर यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना दिल्ली येथे हलवण्यात आले होते.
ADVERTISEMENT

मंगळवारची सकाळ महाराष्ट्र काँग्रेससाठी आणि राजकीय वर्तुळासाठी वाईट बातमी घेऊन उगवली. काँग्रेस पक्षाचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीत निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी बाळू धानोकर यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना दिल्ली येथे हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना 30 मे रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
बाळू धानोकर यांना 26 मे रोजी अचानक त्रास सुरू झाला. त्यांना किडनी स्टोनची व्याधी असल्यानं शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान उपचारादरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना तातडीने नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.
हेही वाचा >> 2024 लोकसभा निवडणूक: BJP-शिंदेंसाठी धोक्याची घंटा, मविआ मारणार मोठी मुसंडी?
नवी दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे (30 मे) दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे.
आज (30 मे) रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 31 मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.










