Covid News : कोरोना मृतांच्या संख्येत वाढ, ठाण्यात 21 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
Corona news : मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईनंतर आता ठाणे शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी एका 21 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

मुंबईनंतर आता ठाणे शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे.

शनिवारी सकाळी एका 21 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे ठाण्यात मृत्यू झाला आहे.
Covid News : मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईनंतर आता ठाणे शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे. ठाणे शहरात शुक्रवारपर्यंत 10 कोरोना रुग्णांची संख्या होती. दरम्यान, शनिवारी सकाळी एका 21 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आता केवळ राज्यातच नाहीतर देशात कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे.
हेही वाचा : फलटणमधील धुमाळवाडीत पावसाचा हाहाकार, पूल वाहून गेला, रस्ताही पाण्यात, 35 गावांचा संपर्क तुटला
तरुण रुग्णाला मधुमेहाचा त्रास असल्याने त्याला कोरोनाचा सामना करता आला नाही. त्याला ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तो मधुमेहावर उपचार घेत होता. याच उपचारादरम्यान त्याच्या फुप्फुसामध्ये संसर्ग निर्माण झाल्याचं तपासातून दिसून आलं. तरुणाची कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणीच्या तपासातून समोर आलं आहे.
रुग्णाची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, त्याला वाचवणे डॉक्टरांना शक्य झालं नाही.
दरम्यान दिल्लीतही कोरोनाने थैमान घातलं आहे. दिल्लीतही अशीच परिस्थिती आहे. स्थानिक प्रशासन काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. तर केरळात 273 कोरोना रुग्ण आढळली आहेत. तर मुंबईत 95 कोरोना रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : लेकानं आईशी ठेवले अनैतिक संबंध, लेकीनं पाहताच बापानं...
कोरोनाची लक्षणे
अंगदुखी, थकवा, डोकेदुखी, सर्दी, चव, वास न येणे अशी लक्षणे दिसून येतील. प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकाने मास्क घालावे, हात स्वच्छ धुवावेत. एकमेकांचा जवळीक संपर्क टाळावा. प्रत्येकानी याची काळजी घेणं गरजेचं आहे.